Ahmednagar News : एका तरुणानेभाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यामुळे बुधवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावात तणावात्मक स्थिती निर्माण झाली होती. याच्याच निषेधार्थ मुंडे समर्थकांनी आज शुक्रवारी पाथर्डी बंदची हाक दिली असल्याने सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्यात आल्यासह चित्र दिसले.
दरम्यान शिरापूर येथील महेश दत्तात्रय शिंदे याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला त्वरित अटक न केल्यास शुक्रवारी (११ मे) ‘पाथर्डी बंद’ची हाक सकल वंजारी समाजाने दिली होती.
बुधवारी सायंकाळी शिंदे याने पंकजा मुंडे यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकून स्टेटसला ठेवल्याचा प्रकार लक्षात येताच मुंडे समर्थकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे गाठले. तणाव वाढू लागताच पोलिसांनी कुमक वाढवून संतप्त जमावाला नियंत्रित केले.
परिसरातील विविध गावातील तरुणांनी शिरापूर येथे संबंधित व्यक्तीच्या घराकडे धाव घेतल्याची कळताच पोलिसांनी तेथे जाऊन वातावरण शांत केले. मुंडे घराण्याच्या आशीर्वादाशिवाय पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाचा आमदार होऊ शकत नसल्याचे चित्र असते.
पंकजा मुंडे यांच्याविरुद्धच्या मजकुरातील शब्दाचा अर्थ वैयक्तिक प्रतिष्ठेशी लावून मुंडे समर्थकांनी तो प्रकार गांभीयनि घेत तालुक्यातील कार्यकत्यांना संघटित केल्याचे चित्र आहे.
बंदला मिळतोय प्रतिसाद
पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मुंडे समर्थकांनी शुक्रवारी पाथर्डी बंदची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत शुक्रवारी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्यात आली होती.