अहमदनगर बातम्या

कांदा सुसाट ! अहमदनगरमध्ये विक्रमी किमतीकडे वाटचाल, पहा ताजे भाव

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : साधारण दोन ते तीन महिन्यापूर्वी कांद्याचे भाव प्रचंड गडगडले होते. निर्यातबंदी सारखे धोरण राबविल्याने शेतकरी मातीमोल झाल्याचा आरोपही करण्यात आला.

परंतु आता कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून चांगलेच सुसाट सुटले आहेत. साधारण ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव मिळत आहेत.

कांद्याचे भाव ५००० रुपयये प्रतिक्विंटल म्हणजे ५० रुपये प्रतिकिलोवर जाऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी, दि. २८ रोजी गावराण कांद्याची १० हजार ६०० कांदा गोणीची व मोकळा कांदा लिलाव पद्धतीत ५९ वाहनांतून आवक आली होती.

कांद्यास सर्वाधिक भाव ४१०० रुपये मिळाला. गोणीतील प्रथम श्रेणीचा कांदा ३७०० ते ४१०० रुपये भाव मिळाला, द्वितीय ३००० ते ३६५०, तृतीय २००० ते २९५०, गोल्टी ३३०० ते ३८०० व खाद ५०० ते १९५० रुपये प्रतिक्विंटल विकला.

मोकळा कांदा लिलाव पद्धतीत प्रथम श्रेणीचा कांदा ३७५० ते ३९०५, द्वितीय ३५०० ते ३७००, तृतीय ३१०० ते ३४५०, गोल्टी ३४०० ते ३८०० व खाद २०५० ते ३०५० या प्रतिक्विंटलने विकला.

कांद्याची आवक वाढती असून भाव मात्र टिकून आहे. गोल्टी व खाद कांद्यास परराज्यांतून वाढती मागणी आहे.

आणखी वाढतील भाव
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पाच ते सहा लाख गोण्यांची आवक होत असते. यंदा मात्र पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट झाली आहे.

लाल कांद्याच्या उत्पादनास अजूनही मोठा अवधी आहे. त्यातच जास्त पावसामुळे लाल कांदा खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे कांद्याचे दर आणखी वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Ahmednagarlive24 Office