Ahmednagar News : ‘मुळा’त अवघा १ हजार ९२३ दलघफू जिवंत पाणीसाठा, जुलैपर्यंतच पिण्यास पाणी, शेतीचा तर प्रश्नच गंभीर

Pragati
Published:
mula dam

Ahmednagar News : मुळा धरण हे दक्षिण नगरचा शेतीचा, पाण्याचा प्रश्न सोडवते. हजारो हेक्टर्स शेती या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच लाखो लोकांची तहान हे धरण भागवत आहे. परंतु आता यंदा या धरणात पाणीसाठा अत्यंत कमी शिलकी राहिला आहे.

पाच वर्षांनंतर प्रथमच मोठे जलसंकट ओढवले आहे. या धरणाची २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. परंतु आता सध्याला मुळा धरणात एकूण ६ हजार ६१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यापैकी ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट हा मृत साठा आहे.

तर अवघा १ हजार ९२३ दस लक्ष घनफूट इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१८ नंतर पहिल्यांदाच मुळा धरणावर जलसंकट ओढवले आहे.

७० हजार ७८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
मुळा धरणावर सध्या राहुरी, नेवासा, शेवगाव व पाथर्डी आदी तालुक्यांचे अंदाजे ७० हजार ७८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे मुळाचे एक रोटेशन बुडाले आहे. त्यामुळे तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. मुळा धरणात यंदा २९ हजार ८०७ दशलक्ष घनफूट नव्याने पाणी जमा झाले.

समन्यायी कायद्यामुळे १ हजार ९२३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. धरणाच्या डाव्या कालव्यातून १० हजार १२१ हेक्टर क्षेत्र व उजव्या कालव्यातून ७० हजार ६८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असून ११ हजार ९६८ दशलक्ष घनफूट इतके पाणी दोन्ही कालव्यांसाठी खर्च झाले आहे.

जुलैपर्यंत पुरेल पाणी
नगर शहराला २.८० व राहुरी ०.४० दशलक्ष घनफूट दैनंदिन पाणी खर्च होते. धरणाच्या पाणी पातळीचा विचार केला तर धरणात सध्या अवघा १ हजार ९२३ दशलक्ष घनफूट इतका जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल असा पाटबंधारे खात्याचा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News