Ahmednagar News : कुकडी प्रकल्पातील आठ धरणांत अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक ! पहा सविस्तर आकडेवारीनुसार पाणीटंचाईची दाहकता

Ahmednagarlive24 office
Published:
kukladi

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील काही गावांसाठी कुकडी प्रकल्प हा अत्यंत महत्तवपूर्ण राहिलेला आहे. परंतु यंदा झालेले कमी पर्जन्यमानामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा हा कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याची दाहकता जाणवू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या आठ धरणांत अवघा २२.४८ टक्के (६.६७ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. जुन्नर तालुक्यात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरण ही पाच धरणे आहेत.

या धरणांपैकी माणिकडोह धरणात ५०२ दशलक्ष घन फूट (४.९४ टक्के), पिंपळगावजोगा धरणात ९५१ दलघफू (२४.४५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी धरणात आजमितीला ३६.०५ टक्के (१०. ६९ टीएमसी) पाणीसाठा होता. तथापि यावर्षी आजमितीला २२.४८ टक्के (६.६७ टीएमसी) पाणीसाठा सर्व धरणात शिल्लक असल्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान जलसंपदा विभागापुढे आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंजूर केलेल्या आवर्तनानुसार पाण्याचे नियोजन करण्यात येते. यंदा खरीप आवर्तन २७ जुलै २०२३ ते ९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान दोन टण्यात ५.६११ टीएमसी आवर्तन देण्यात आले.

रब्बीचे आवर्तन १५ डिसेंबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ दरम्यान ४.७०९ टीएमसी आवर्तन सोडण्यात आले. उन्हाळी आवर्तन २४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू असून, मंजूर आवर्तनानुसार ४.६ टीएमसी पाण्यापैकी ४.१५५ टीएमसी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

कुकडी प्रकल्पातील धरणनिहाय पाणीसाठा
येडगाव धरण ४१८.६३ दलघफू, (२१.५४ टक्के), माणिकडोह ५०२.८१ दलघफू (४.९४ टक्के), वडज ३९६.१६ > दलघफू (३३.७६ टक्के), पिंपळगाव जोगा ९५१.२३ दलघफू (२४.४५ टक्के), डिंभे ४४०९.७५ दलघफू (३५.२३ टक्के), चिल्हेवाडी १६७.९५ दलघफू (२०.९२ टक्के), विसापूर १२९.०८ दलघफू (१४.२७ टक्के), घोड १२०२.१२ दलघफू (२४.६७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe