Ahmednagar News : गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
सध्या तरी जिल्ह्याला चारा टंचाई भारसणार नसली तरी पावसाळा लांबला तर पुढे जिल्ह्याला चाराटंचाईला तोंड द्यावे लागेल अशी परिस्थिती आहे. सध्या जिल्ह्यात पुढील दीड महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. नुकतीच पशुसंवर्धन विभागाची बैठक झाली असून या बैठकीत पारनेर तालुक्यातील खडकवाडी व सावरगाव,
शेवगाव तालुक्यातील बेलगाव या तीन गावामध्ये येत्या पंधरा दिवसांनी चारा टंचाई भासू शकते असे सांगण्यात आले आहे. मात्र या गावांच्या जवळपास चारा उपलब्ध असल्याने त्यांची ती गरज पूर्ण करू शकती. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
मात्र पाणीटंचाईमुळे भविष्यात चाराच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो. एप्रिल महिन्यात घेतल्या आढाव्यानुसार ११० दिवस चारा उपलब्ध होईल, असे चित्र होते. त्यातील एक महिना संपला आहे. त्यानुसार ८० दिवस चारा शिल्लक असला तरी जनावरांची संख्या व त्यांना टंचाईत देण्यात येणाऱ्या चाऱ्यापेक्षाही जास्त चारा दिला जात असल्याने पुढील दीड महिनाच पुरेल एवढा चारा शिल्लक आहे.
टंवाईत मोठ्या जनावरांना १५ किलो कोरडा चारा किंवा ६ किलो हिरवा चारा तर लहान जनावरांना ७.५० कोरडा किंवा ३ किलो हिरवा चारा देण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्यक्षात मोठ्या जनावरांना कोरडा चारा २५ किलोपर्यंत दिला जातो. त्यामुळे उपलब्ध चारा कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात मोठी जनावरे १३ लाख १६ हजार ६४२, लहान २ लाख ८३ हजार १६ अशी १५ लाख ९९ हजार ६५८ जनावरांची संख्या आहे. त्यात १४ लाख ७९ हजार शेळा व मेंढ्यांची संख्या आहे. या जनावरांना सध्या जिल्ह्यात १० लाख ३२ हजार ६३२ मेट्रीक टन कोरडा तर ३३ लाख ३० हजार ८२३ हिरवा मेट्रीक टन चारा शिल्लक आहे. जिल्ह्यात चारा टंचाई भासू नये म्हणून ४ हजार ४८७ हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांचे नियोजन केले आहे. त्यासाठी मोफत चारा बी शेतकऱ्यांना उपलब्ध करू देण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची वय्वसथा अहो. अशा शेतकऱ्यांना हेक्टर ४ हजार रुपयांचे बी उपलब्ध करून देण्यात आले असून आतापर्यंत निम्या क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे. मका व बाजरी ही पिके घेण्यात येत आहे. त्याबरोबर राहुरी कृषी विद्यापीठमध्ये १०४ एकरवर चारा पिक घेण्यात आले असून ते अत्यावश्यक मध्ये ते नियोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी चारा टंचाईबाबत आढावा बैठक झाली. त्यात खडकवाडी, सावरगाव व बेलगाव या तीन गावामध्ये चारा टंचाई भासू शकते असे सांगण्यात आले. मात्र त्या गावांजवळील गावांधमध्ये चारा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यात देखील चारा उपलब्ध असल्याने सध्या तरी चारा टंचाई नाही.
मात्र पाऊस लांबला तर चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात अवकाळी पाऊस काही भागात झाल्याने तेथे चारा उपलब्ध होत आहे अशी प्रतिक्रया डॉ. सुनील तुंबारे, उपायुक्त पशुसंवर्धन यांनी मीडियाही बोलताना दिली होती.