अहमदनगर बातम्या

अहमदनगरमधील ‘या’ कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश, राजळे-जगतापांना विधानसभेपूर्वीच धक्का, इतर कारखानेही रडारवर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. आता या निवडणुकांपूर्वीच एक मोठी बातमी आली आहे. माजी आ. राहुल जगताप व आ. मोनिका राजळे यांच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आहे.

श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यावर थेट कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे वृद्धेश्वर कारखान्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालकांनी ठेवला असल्याची माहिती समजली आहे.

कारवाई का?
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकवल्याप्रकरणी कारवाई होणार आहे. कारखान्याकडून 21 कोटी 3 लाख 50 हजार रुपयांची वसुली केली जाणार असून कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करुन त्याची विक्री करून शेतकऱ्यांना त्यांची रक्कम दिली जाईल.

तसे आदेश देण्यात आल्याची माहिती समजली आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याचे समजते.

जिल्ह्यातील या कारखान्यांवर ‘आरआरसी’चे प्रस्ताव
नगर जिल्ह्यातील अगस्ती, वृद्धेश्वर, गंगामाई इंडस्ट्रिज या कारखान्यांच्या ‘आरआरसी’चे प्रस्ताव आयुक्तांकडे देण्यात आले आहेत. 31 मे रोजी कुकडी कारखान्यासाठी साखर आयुक्तांकडून हा आदेश दिला गेला होता परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागील तीन सप्ताहात शेतकऱ्यांचे देय पैसे देण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नसल्याची माहिती समजली आहे.

कुणाकडे किती थकलेत पैसे?
अगस्ती कारखान्याकडे शेतकऱ्यांचे 13 कोटी 11 लाख 85 हजार रुपये
वृद्धेश्वर कारखान्याकडे 8 कोटी 14 लाख 44 हजार रुपये
गंगामाई इंडस्ट्रीजकडे 17 कोटी 7 लाख 78 हजार रुपये

विधानसभेच्या तोंडावर धक्का
कारखान्यावर उगारलेला कारवाईचा बडगा हा जगताप-राजळे यांच्यासाठी विधानसभेपूर्वीचा मोठा धक्का मानला जातोय. माजी आमदार राहुल जगताप शरद पवार यांच्या पक्षात असून विधानसभा निवडणुकीची त्यांनी तयारी देखील सुरु केल्याचे बोलले जाते. आता हा त्यांच्यासाठी देखील धक्का मानला जातोय.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office