अहमदनगर बातम्या

पारनेर-मुंबई एसटी व कारचा भीषण अपघात ! दोघे ठार, पंधरा जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अपघातांची मालिका सुरूच असताना आता आणखी एका भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी व ब्रिझा कारचा भीषण अपघात झाला.

समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर १५जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी कल्याण-नगर महामार्गावर ओतूर महाविद्यालयाजवळ घडली.

हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला. महेश तानाजी गायकवाड (वय २३, रा. मोहोळ, जि. सोलापूर), प्रतीक अशोक शिर्के (वय २२, रा. नारळा, ता. पैठण, जि. संभाजीनगर) मृतांची नावे आहेत.

अपघातातील १५ जखमींना आळेफाटा, नारायणगाव येथे उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. पारनेर एसटी आगराची पारनेर-मुंबई ही एसटी बस (एमएच १४, बीटी ४२८०) नगर कल्याण महामार्गावरून मुबंईला जात असताना

ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणारी ब्रीझा कार (एमएच ४६, सीएम २१५५) ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ब्रिझा कार चालकासह दोनजण जागीच ठार झाले, तर पारनेर मुबंई एसटीमधील पंधरा प्रवासी जखमी झाले.

परिसरातील ग्रामस्थांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी हलविले. या एसटी बसमध्ये एकूण ४० प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ब्रिझा कार आणि एसटी अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कार जाग्यावरच चक्काचूर झाली,

तर एसटी रस्ता सोडून खाली खड्यातील झाडीत गेली. ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलिस हवलदार शामसुंदर जायभाय, मनोज कोकणी, विलास कोंधवळे यांनी पोलिस पथकासह मदत कार्य केले.

Ahmednagarlive24 Office