अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : द्वेषाचे राजकारण करणारे सरकार जनतेला मान्य नाही; आमदार बाळासाहेब थोरात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाकडून देश पातळीवर होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नाही. याविरुद्ध मतदारांनी कौल देऊन भाजपची मस्ती जिरवली आहे. अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणूकीमध्ये आघाडीच्या उमेदवारांनी राज्यात उत्कृष्ट यश मिळवल्याने संगमनेर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जिलेबी वाटत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आमदार थोरात बोलत होते. याप्रसंगी डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, निखिल पापडेजा यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्र पक्षांचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आमदार थोरात पुढे म्हणाले की, देशातील आलेले सरकार या विरोधात जनतेमध्ये अत्यंत रोष आहे. जनतेने मतपेटीतुन आपला राग व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला सत्तेचा गैरवापर, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भरती मधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गैर व्यवहार,राज्यात बिघडलेली शांतता, सुव्यवस्था, यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे.

दरम्यान, मंत्री विखे यांनी ज्या पद्धतीने दहशतीचे राजकारण करून चुकीचे प्रशासन राबवले, याबद्दल जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे, तेही उडणार असल्याची टीका देखील आमदार थोरात यांनी केली. तर खासदार निलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले. परंतु पारनेर मध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत, यामुळे निलेश लंके यांनी त्यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे.

महाविकास आघाडीला मोठा भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल सध्याचे राजकारण आणि राज्य पातळीवर चुकीचा पांयडा पाडून असे चुकीचे राजकारण मान्य नसून मतदानातून तो जनतेने तो आमदार थोरात यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीचा होणार असल्याचे सूतोवाचदेखील त्यांनी केले.

Ahmednagarlive24 Office