Ahmednagar News : अहमदनगरमधून एका व्हिडिओबाबत वृत्त आले आहे. महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली.
त्याला त्या महिलेने नकार दिल्यावर अश्लील शिवीगाळ करून अपमानित करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा एका महिलेने सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करत दिला आहे.
सदर व्हिडीओ हीच माझी सुसाईड नोट समजावी असेही या महिलेने म्हंटले आहे. सदरची महिला ही संगमनेर मधील असून तिचा व्हिडीओ सोशल मि डीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यामध्ये तिने म्हटले आहे की, संगमनेर मधील एका पोलिस अधिकाऱ्याने ९ एप्रिल २०२४ रोजी आपल्या कडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास आपण नकार दिल्यावर त्याने पोलिस ठाण्यात सर्वांच्या समक्ष आपणास अश्लील शिवीगाळ करून अपमानित केले.
या प्रकाराबाबत आपण अनेकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र अद्यापही या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तसेच त्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईही करण्यात आलेली नाही.
त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सर्व जनते समोर न्यायाची अपेक्षा करत आहे. जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्या नालायक पोलिस अधिकाऱ्यावर ८ दिवसांत कारवाई केली नाही
तर आपण येत्या १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असून त्यास सर्वस्वी तो पोलिस अधिकारी व त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी जबाबदार असतील. हा व्हिडीओच माझी सुसाईड नोट समजावी असेही या महिलेने म्हटले आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील सत्यता किती हे माहित नाही पण या व्हिडीओने चर्चाना उधाण आले आहे.