अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील डाळिंब थेट फॉरेनला, ३० कोटींची कमाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात आता शेतकरी आधुनिकतेचा वापर करताना दिसत आहेत. सिंचन पद्धती असेल किंवा पीकपद्धती असेल यामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर तसेच मार्केट शोधण्याची विविध पद्धती याचा अवलंब केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत आहे.

आता अहमदनगर जिल्ह्यातील राशीन मधील देशमुखवाडी चर्चेचा विषय ठरत आहे. देशमुखवाडीकरांनी सुमारे साडेतीनशे एकर क्षेत्रावर डाळींब बाग फुलल्या. शेततळे व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खडकाळ माळरानावर फुलवलेल्या हिरव्यागार डाळींब बागांनी देशमुखवाडीकरांना यंदा सुमारे ३० कोटींची कमाई केली.

देशमुखवाडीच्या डाळींबाची थेट दुबई, बांग्लादेश आणि मलेशियात निर्यात सुरू आहे. खडकाळ माळरानावर कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर देशमुखवाडीतील तरुण आणि होतकरू शेतकऱ्यांनी डाळींब बागांवर लक्ष्य केंद्रित केले.

कुकडीच्या आवर्तनातून मिळणारे पाणी साठवण्यासाठी तयार केलेली मोठ-मोठी शेततळी भरून, ठिंबक सिंचनातून पाणी टंचाईवर कायमची मात त्यांनी केली. त्यामुळे यातून पीक उत्पनाचे नियोजन उत्तम तर झालेच शिवाय अनेकांना हे एक आदर्श ठरत आहे.

कृषी विभागाने विविध योजना आणि अनुदान देऊन डाळींब लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. १२६ रुपये किलोने दहा टन डाळींबाची दुबईला निर्यात केली असल्याचे येथील एक ग्रामस्थ सांगतात.

कसे केले डाळिंब पिकाचे नियोज
डाळिंबाच्या भगव्या वाणाची लागवड करण्यात आली. डाळिंबाचे १०० टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली त्यांनी आणले. डाळिंबाकरिता १०० टक्के क्रॉप कव्हर व मल्चिंगचा वापर केल्याने मोठा फायदा मिळाला.

पाणी दुष्काळावर मात करण्यासाठी येथे तब्बल १२५ पेक्षा जास्त शेततळी असून ४०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर फळबाग लागवड केली जातेय. एकरी १२ ते १५ टन उत्पन्न शेतकरी घेतायेत.

 

Ahmednagarlive24 Office