Ahmednagar News : ‘या’ तालुक्यात पावसाची हजेरी ; पिकांना जीवदान

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत असताना, शनिवारी (दि. २२) संध्याकाळी पाचच्या सुमारास नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्टयातील काही गावात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, मका, ऊस पिकांना जीवनदान या पिकांना जीवदान मिळाले आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे वाफसा होताच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने दिवसभर व रात्री देखील मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. शेतात पेरणी केलेली पिके चांगली उगवली आहेत. मात्र पाऊस गायब झाला आहे, त्यामुळे आता शेतकरी परत एकदा पावसाची वाट पाहत होता .

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने नेवासा तालुक्यात देखील जोरदार हजेरी लावली होती. सर्वच आठही महसूल मंडळांत कमी- अधिक पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या, मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत असताना, शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील पश्चिम पट्टयातील पश्चिम पट्टयातील पाचेगाव, कारवाडी, बेलपिंपळगाव, पुनतगाव, गोणेगाव, खुपटी, निंभारी, अमळनेर, वाटापूर, करजगाव, पानेगाव, शिरेगाव आदी गावांतील परिसरात सायंकाळी पाचनंतर दमदार पाऊस बरसला. सायंकाळी सातपर्यंत या भागात पाऊस पडत होता.

उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. जिरायती पट्ट्यात पावसाच्या भरवशावर खरिपाच्या लागवडी व पेरणी केलेल्या कपाशी, सोयाबीन, मका, तूर आदी पिकांना या पावसामुळे जीवनदान मिळाले आहे. वेळेत पाऊस आल्याने बळीराजाच्या आनंद झाल्याचे पाहायला मिळाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe