Ahmednagar News : राहुरी फॅक्टरी ते कोल्हार दरम्यान असणाऱ्या एका हॉटेलजवळ चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नगर-शिर्डी रोडवर कोल्हार
खुर्द परिसरात हॉटेलजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम परप्रांतिय महिलांकडून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समजले.
त्यामुळे पोलीसांनी याबाबत एक बनावट ग्राहक तयार केला. बनावट ग्राहक बनवून पोलीस त्याच्याबरोबर सदर हॉटेलच्या जवळ गेले.ठरल्या प्रमाणे पंचासमक्ष सदर ग्राहकाकडे ५०० रुपयाची नोट दिली. आणि सदर बनावट ग्राहक हा सदर हॉटेल जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गेला असता तिथे एक इसम होता.
बाहेर एक व आत एक महिला होती. सांगितल्या प्रमाणे सौदा ठरल्यानंतर बनावट ग्राहक असलेल्याने पोलिसांना मिस्कॉल केला. त्यामुळे पोलीस लगेच त्या शेडजवळ गेले. तेथे एक इसम आणि दोन महिला आत असल्याचे दिसून आले. यातील आरोपी
हा त्याच्या आर्थिक फायदासाठी या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे आढळून आले. त्याठिकाणी पश्चिम बंगालच्या दोन महिला यांच्याकडून सदर आरोपी हा ग्राहकांकडून पैसे घेऊन वेशा व्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलीसांनी सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी त्याच्या आर्थिक फायदासाठी या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही महिलांची आरोपीच्या ताब्यातून सुटका केली आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे. ही घटना वाऱ्यासारखी परिसर पसरली. परिसरात खळबळ उडाली होती.