Ahmednagar News : ‘या’ हॉटेलवरील कुंटणखान्यावर छापा; तिघींची सुटका

Pragati
Published:
veshya vyavasay

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात कुंटणखान्यावर छापा टाकून कारवाई करण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आताहमदनगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर छापा टाकत मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे करण्यात आली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस पथकाने नगर-सोलापूर रस्त्यावरील बनपिंप्री शिवारात हॉटेल सुप्रीम येथे छापा घालून कुटणखान्यातून तीन महिलांची सुटका केली. कुंटणखाना चालक किरण रावसाहेब जरे (वय ३९, रा. नालेगाव, नगर) याला अटक केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नगर-सोलापूर रस्त्यावरील बनपिंप्री शिवारातील हॉटेल सुप्रीम येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल समीर सय्यद, महिला हेडकॉन्स्टेबल अर्चना काळे, छाया रांधवन यांच्या पथकाने रविवारी (दि.१६) पहाटे छापा घातला.

त्या वेळी आरोपी किरण जरे वेश्या व्यवसायासाठी महिला उपलब्ध करून देऊन कुंटणखाना चालविताना आढळून आला. त्याच्याकडून चार हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व तीन पीडित महिलांची सुटका केली.

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागातही अशाच पद्धतीचे अनेक कारवाया या आधीही करण्यात आलेल्या आहेत. नगर शहरासह तालुक्यातही अशा कारवाया करण्यात आल्या. दरम्यान पोलीस कारवाया होऊनही काही विचित्र बुद्धीचे लोक पुन्हा पुन्हा अशी कृत्ये करताना दिसतात. आता श्रीगोंदेतील या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News