Ahmednagar News : लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. भरारी पथके, विविध पोलीस पथके तपासणीसह विविध कामे करत आहेत. अनेक ठिकाणी रक्कम जप्त करण्यात आलेल्या काही घटना घडल्या. आता पुन्हा एकदा नगर शहरातून एक बातमी आली आहे.
नगर शहरातील एका हॉटेलमध्ये निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी छापा टाकला. छापा टाकल्यानंतर तब्बल साठ हजार रुपयांची रोकड या हॉटेलमधून पथकाने पकडली. याप्रकरणी तीनजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
त्यांची सायंकाळी सहा वाजल्यापासून चौकशी सुरू होती. रात्री साडेदहा पर्यंत माहिती घेतली असता याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर तेथे पोलिस व पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद होऊन गोंधळ उडाला असल्याची माहितीही मिळाली.
पोलिस व पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद?
शहरातील एका खासगी हॉटेलमधून साठ हजार रुपये रोकड निवडणूक शाखा व पोलिस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली. याबाबत चौकशी करण्यासाठी तीनजणांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
तिथे त्यांची सहा वाजेपासून चौकशी सुरू होती. दरम्यान, ही माहिती मिळतात शहरातील काही राजकीय पक्षांचे पदाधिकारीही पोलिस ठाण्यात दाखल झाले.
यावेळी पोलिस व पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद होऊन गोंधळ उडाला अशी माहिती समजली आहे. पोलिसांनी ही चुकीची कारवाई केली असल्याचा त्यांचा आरोप होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज
निवडणुकीच्या अनुशंघाने प्रशासन सज्ज झाले आहे. भरारी पथके असतील, महसूल विभाग, निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन आता सज्ज झाले आहे. सर्वतोपरी तयारी प्रशासनाकडून झाली आहे. निवडणुकीची टक्केवारी वाढावी यासाठी देखील प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुशंघाने काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी देखील प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून कारवाई करत आहे.