अहमदनगर बातम्या

‘मुळा’ पाणलोटात पाऊस उघडला ! पहा सर्वच धरणातील किती झालाय पाणीसाठा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मागील पंधरवाड्यात मुळा, भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस झाला. त्यामुळे धारांत देखील आवक सुरु होती. आता या क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणाकडे होणारी पाण्याची आवक मंदावली आहे.

झपाट्याने होत असलेल्या पाणीसाठा वाढीला ब्रेक लागला आहे. २६ हजार दलघफू क्षमतेच्या धरणात २२ हजार २७७ दलघफू ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

पावसाने ओढ दिल्याने केवळ ३ हजार ८२२ क्यूसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक सुरू आहे. शासकीय निर्देशांकानुसार २२ हजार ८१४ दलघफू पेक्षा अधिक पाणी साठा जमा झाल्यास पाणी सोडण्याचा निर्णय होऊ शकतो.

जिल्ह्याचे सर्वाधिक मोठे जलस्त्रोत असलेल्या मुळा धरणाकडे गत आठवड्यात आवकेची विक्रमी नोंद झाली. गत पाच वर्षातील आवकेचा रेकॉर्ड तोडत सुमारे ४१ हजार क्यूसेक प्रवाहाने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली.

त्यानंतर आवकेत सुरू झालेली घसरण ३ हजार ८२२ क्यूसेक क्यूसेकवर येऊन ठेपली आहे. तीन दिवसांपासून दऱ्या खोऱ्यातील झिरपणाऱ्या पाण्यामुळे आवक सुरू असल्याचे चित्र आहे. मुळा धरणाचा पाणी साठा ३१ जुलै रोजी १६ हजार दलघफू इतका होता.

आठवड्यातच पाणलोट क्षेत्रावर कोसळलेल्या ढगफुटीसदृष्य पावसाने तब्बल ५ हजार ६६४ दलघफू पाण्याची वाढ झाल्याचे दिसून आले. तीन दिवसापासून पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. राहुरी परिसरातही पावसाने उसंत घेतली आहे.

शुक्रवार, दि. ९ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता धरणातील साठा
भंडारदरा धरण – १०४४१ दलघफू (९४.५८ टक्के)
मुळा धरण – २२ हजार २७० दलघफू (८५ टक्के)
निळवंडे धरण – ७५८१दलघफु (९१.०३ टक्के)
जायकवाडी धरण – १३०७.९३ दलघमी (२६.२५ टक्के)
आढळा धरण – १०६० दलघफू (१०० टक्के)

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office