अहमदनगर बातम्या

राम शिंदेंनाच यश, पवारांना धक्का ! ‘तेथेच’ होणार एमआयडीसी, आदेश निघाला, कोठे व किती जमीन अधिग्रहण होणार? पहा सविस्तर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  कर्जत तालुक्यात एमआयडीसीवरून झालेली रणधुमाळी सर्वांचीच पाहिली. आ. रोहित पवार यांनी ज्याठिकाणी एमएडीसी करायचे ठरवले होते ते रद्द करून नवीन ठिकाणी एमआयडीसी व्हावी यासाठी

आमदार राम शिंदे यांनी प्रयत्न केले. आता आ. शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

कर्जत तालुक्यातील कोंभळी एमआयडीसीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये प्रकरण ६ व कलम २ खंड (ग) लागू करण्यास उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता दिली आहे. त्यामुळे आता याठीकाणीच एमआयडीसी होणार असून आ. पवारांना धक्का बसला आहे.

२४६ हेक्टर जमीन संपादीत करणार
२ ऑगस्टला उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीची बैठक झाली. यात कर्जत एमआयडीसी निर्मितीबाबत चर्चा होऊन कोंभळी व खांडवी शिवारातील सुयोग्य व समतल क्षेत्र एमआयडीसीसाठी निश्चित केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (३) यांच्या अध्यक्षतेखालील भूनिवड समितीच्या २६ जूनच्या अहवालानुसार कोंभळी शिवारातील खासगी १६८.२३ हेक्टर आर व खांडवी शिवारातील ७७.८२ हेक्टर आर अशी एकूण खासगी क्षेत्र २४६.०५ हेक्टर आर संपादित करण्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे.

लवकरच भूसंपादन
उच्चाधिकार समितीने मऔवि अधिनियम १९६१ अन्वये प्रकरण ६ व कलम २ खंड (ग) च्या तरतुदी लागू करण्यास मान्यता दिली आहे. उद्योग विभागाने २९ ऑगस्टला याबाबत आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे कोंभळी परिसरातील जागा एमआयडीसाठी आरक्षित झाली असून, लवकरच भूसंपादन सुरु होणार आहे.

Ahmednagarlive24 Office