अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नादखुळा ! अडीच लाखात खरेदी केल्या ‘राणी’ अन ‘चांदणी’ गाई ; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही…

Published by
Ajay Patil

Ahmednagar News : ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला गाई बैलाची जोड नाही तो शेतकरीच नाही असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. बळीराजाच आपल्या जमिनीवर आणि आपल्या गाई-बैलांवर अपार प्रेम असतं.

अहमदनगर जिल्ह्यातील एका नादखुळा शेतकऱ्यानेही मनपसंत गाई लाखो रुपये देऊन खरेदी केल्या आणि या गाईंची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढली. यामुळे सध्या अहमदनगर मधील हा अवलिया शेतकरी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या मौजे टाकळी येथील शेतकरी बापू चव्हाण यांनी दोन लाख 45 हजार रुपयांना दोन जातीवंत गाईंचे खरेदी केली.

या प्रयोगशील शेतकऱ्याला या गाई एवढ्या आवडल्या की त्यांनी या गाईंची खरेदी केल्याबरोबर त्यांना राणी आणि चांदणी ही नाव दिली. पट्ट्या इथेच नाही थांबला तर चक्क ढोल-ताशांच्या गजरात गायींची मिरवणूक काढली. विशेष म्हणजे शेतकरी बापू चव्हाण यांच्या आनंदात इतर शेतकऱ्यांनी देखील मोठ्या आनंदात सहभाग नोंदवला.

गुलालाची उधळण केली या लाखो रुपये किमतीच्या गायीसोबत सेल्फि देखील काढल्या. खरं पाहता शेतकरी बापू चव्हाण यांना पशुधनाची मोठी आवड आहे. सुरवातीपासून त्यांना आपल्या दावणीला पहिलारू गाय असावी असं वाटायचं अन अखेर त्यांना अशा गाई दिसल्यानंतर त्यांनी लाखो रुपय मोजत गाई खरेदी केल्या.

पहिलारु गाईच्या शोधात असलेल्या बापू यांना कोळपेवाडी येथे एका माणसाकडे पहिलारू अन जातिवंत गाई आहेत अशी माहिती मिळाली. मग काय पट्ट्या क्षणाचाही न विलंब करता कोळपेवाडीला गेला आणि अडीच लाख रुपये मोजून चांदणी आणि राणी घरी घेऊन आला यामुळे सध्या परिसरात बापूंची फुलटू धमाल चर्चा सूरु आहे. निश्चितच शेतकऱ्याचे आणि त्याच्या गोठ्यात दावणीला बांधलेल्या पशुधनाचं अनोख नातं या उदाहरणावरून समोर आल आहे. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil