Ahmednagar News : अहमदनगरमध्ये मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे.अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊसही झाला आहे. परंतु हे एकीकडे जरी खरे असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील काही भागात अद्यापही पाणीटंचाई जाणवत असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यातील २९३ गावे आणि १ हजार ५७८ वाड्यांमध्ये पाणी टंचाई असून तब्बल ३१६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात मान्सून दमदार झाल्याने अनेक गावातील पाणी पुरवठा स्त्रोत सुरू झाले आहेत. एक आठवड्यात ६६ टँकर बंद झाले आहे.
काही गावातील विहिरींना सध्या गढळू पाणी असल्याने टँकर सुरू आहेत. गेल्या महिन्यात ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडले होते. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरच्या मागणी देखील वाढ होती. मात्र गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने टँकरची संख्या घटत असल्यातरीही जिल्ह्यात १ हजार ५७८ वाड्यावस्त्यावर अद्याप पाणी टंचाई आहे.
विहिरीतील पाण्याचा दर्जा सुधारल्यावर आणखी बऱ्यात गावातील टँकर बंद होणार आहेत. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला होता. उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणी टंचाई निर्माण झाली. एप्रिल मे महिन्यातच जिल्ह्यात पाणी टंचाईचे स्वरूप तीव्र झाले आहे.
पाथर्डी, संगमनेर, पारनेर, नगर, कर्जत-जामखेड तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. जिल्ह्यातील २९३ गावातील १ हजार ५७८ वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ५ लाख ८२ हजार ३९० जनता टँकरच्या पाण्यावर असल्याचे भीषण परिस्थिती होती.
तालुकानिहाय टँकरची आकडेवारी
संगमनेर-३१, अकोले- ५, कोपरगाव ८, नेवासे २, राहाता-२, नगर-३५, पारनेर-३५, पाथर्डी- ९३, शेवगाव-१४, कर्जत-१७, जामखेड- २६, श्रीगोंदे- ९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
आतापर्यत झालेला पाऊस (मि.मी.)
नगर : १७०.६ पारनेर १४१.८, श्रीगोंदा २१७.४, कर्जत : २३६.८, जामखेड : १८४.९, शेवगाव ११५, पाथर्डी : १९६.१, नेवासा : ११६.७, राहुरी : १०३.८, संगमनेर ८६.५, अकोले ६६.२, कोपरगाव : ९३.१, श्रीरामपूर : १०३.६, राहाता : ९१.५.