अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन ! अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नाद खुळा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : उन्हाळ्यात आंब्याला मोठी मागणी असते. अक्षय तृतीय व त्यानंतर आंब्याची मागणी वाढत जाते. आता अहमदनगरमधील एका शेतकऱ्याचा सत्कार होतोय. याचे कारण म्हणजे त्याने दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

अशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने हापूस आंबा पिकवून बाजार समितीमध्ये उच्चांकी भाव मिळविणाऱ्या आंबा उत्पादक शेतकऱ्याचा बाजार समितीमध्ये गौरव करण्यात आला

भाळवणी (ता. पारनेर) येथील रामदेव दगडू पवार यांच्या शेतात प्रगतिशील शेतकरी सुधाकर कारभारी ताके यांनी नैसर्गिकरित्या पिकविलेल्या आंब्याचे विक्रमी उत्पादन घेऊन उच्चांकी भाव मिळविला.

ताके यांचा आडत व्यापारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अक्षय्यतृतीयानिमित्त मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आंब्याची आवक झाली. मात्र, रामदेव दगडू पवार यांच्या शेतात ताके यांनी नैसर्गिक पद्धतीने आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले.

दीडशे एकर शेतीत २३ हजार केशर आंब्याचे झाडे आहेत. नैसर्गिक पद्धतीने झाडांची लागवड करून आंबे नैसर्गिकरित्या पिकविण्यात आले आहेत.

बाजारात आंबे आले असताना त्याला प्रति किलो १४० रुपये किलोंचा भाव मिळाला, तर काही मिनिटातच शंभर कॅरेटची विक्री झाल्याचे ताके यांनी सांगितले. एका व्यापाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकरी नैसर्गिक पद्धतीने गुजरातच्या केशर आंब्यापेक्षाही अधिक दर्जेदार पध्दतीचे आंबे पिकवत आहेत.

हायब्रीडच्या युगात केमिकलचा अतिवापर करून फळे पिकवले जात असताना ते आरोग्याला घातक ठरत आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनाने नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांना अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंब्याचे उत्पन्न घेतले जाते. मुळा खोऱ्यात गावरान आंब्याचे प्रमाण अधिक असते. दरम्यान उच्च गुणवत्ता राखली तर उत्पन्नही प्रचंड मिळू शकते हेच जणू ताके यांनी दाखवून दिले आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातून आता अनेक प्रगतशील शेतकरी पुढे येत आहेत. आपल्या कल्पकतेने, आधुनिक पद्धतीच्या वापराने ते शेती करत असून भरपूर उत्पन्न घेत आहेत. द्राक्षे शेती असेल, खरबूज शेती असेल किंवा इतर पिके असतील अहमदनगरमधील शेतकरी यातूनही उत्पन्न कमावत आहे.

Ahmednagarlive24 Office