Ahmednagar News : नगर अर्बन बँकेच्या पाच लाखाच्या आतील ठेवीदारांचे तिसऱ्या व शेवटच्या क्लेममधील तांत्रिक पूर्तता अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच ६० ते ६५ कोटी रुपयांचे वाटप सुरू होईल, असा विश्वास बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी व्यक्त केला. हे पैसे खातेदारांच्या इतर बँकांमधील खात्यात जमा होणार असून,
ही पूर्तता झाल्यानंतर पाच लाखापुढील ठेवीदारांचे ठेवी परत करण्याच्या नियोजनातील एक मोठा अडथळा दूर होईल, असा दावाही त्यांनी केला. बँक बचाव समित सर्व प्रक्रियेच्या पाठपुराव्यावर लक्ष ठेवून आहे, असे स्पष्ट करून गांधी म्हणाले, अवसायकांनी जाहीर केलेल्या एकरकमी परतफेड योजनेला कर्जदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
१८ ते १९ कोटीची थकित वसुली झाली आहे व येणाऱ्या काळात यात मोठी वाढ होईल. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी कर्जदारांनी थकविलेले पैसे परत करणे हा एकमेव उपाय आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
दरम्यान, फॉरेन्सिक ऑडीटर पुन्हा एकदा अहमदनगरला येणार आहेत व अर्बन बँकेत गैरव्यवहार करून बँक बुडवणाऱ्या आरोपींच्या यादीत आणखी काही नावे वाढण्याची शक्यता आहे, असा दावाही गांधी यांनी केला.
एक अधिकारी ताब्यात
राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा पथकाने त्याला नगरमध्ये आणले. फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे.