Ahmednagar News :- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा- नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं.
शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम स्फोटातील सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो.
हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरे लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेने या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले.
त्यांचा जीर्णोदधार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे अहमदनगर हे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे. त्यामुळे आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात?
मुघलशाही की होळकरशाहीचा? ‘अहिल्यानगर’ नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल, ही अपेक्षा. अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे लक्षात ठेवा, असा इशाराही पडळकर यांनी पत्रात दिला आहे.