Ahmednagar News : नगर शहरात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत नगर दौंड रोडवर अरणगाव जवळ असलेल्या एका हॉटेलमधील लॉजवर अनेकदा घेवून जात तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे.
अखेर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश अंबादास कस्तुरी (रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने नगर शहरातील तोफखाना भागात राहणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी फेब्रुवारी २०२४ मध्ये ओळख वाढविली.
काही दिवसांत ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्याने तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवले. दिल्लीगेट परिसरात एकदा तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केला. त्यानंतर ४-५ महिन्यात अनेकदा तिला फूस लावून,
विविध प्रकारचे आमिष दाखवून नगर दौंड रोडवर अरणगाव जवळ असलेल्या एका लॉज वर नेवून तिच्यावर अत्याचार केला. वारंवार झालेल्या या प्रकारामुळे ती गर्भवती राहिली. त्यामुळे तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तिला विश्वासात घेवून सखोल विचारपूस केल्यावर तिने तिच्याबाबत घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर तिने कुटुंबियांसमवेत सोमवारी (दि.२९) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी राजेश अंबादास कस्तुरी याच्यावर गुन्हा दाखल केला.
मात्र अत्याचाराचा पहिला प्रकार दिल्लीगेट परिसरात झालेला असल्याने हा गुन्हा मंगळवारी (दि.३०) नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.