Ahmednagar News : शिकारी वन्य प्राण्यामध्ये वाघ आणि सिंह हे सर्वात मोठे आहेत. त्यानंतर चित्ता व नंतर बिबट्याचा नंबर लागतो. मात्र संशोधकांनी वाघ आणि सिंह यांच्यापेक्षा मोठा व साध्या अस्तित्वात असलेल्या चित्त्यांपेक्षा व जगातील सर्वात मोठ्या शिकारी चित्त्याच्या प्रजातीचा शोध घेतला आहे. चीनमधील संशोधकांनी आतापर्यंत ज्ञात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या या चित्त्याच्या प्रजातीचा शोध लावला आहे. या प्राण्याच्या महाकाय कवटीच्या जीवाश्मांचे विश्लेषण करून शोधलेला हा महाकाय शिकारी चित्ता आजच्या सर्वात मोठ्या सिंह आणि आधुनिक चित्त्यांपेक्षा तिप्पट वजनदार होता.
चीनमध्ये सापडलेल्या चित्त्याची ऍसिनोनिक्स एप्लेइस्टोसेनियस नावाची ही प्रजाती सुमारे १.३ दशलक्ष ते पाच लाख वर्षांपूर्वी युरेशियामध्ये फिरत होती. त्याचे प्रथम वर्णन १९२५ मध्ये उत्तर चीनमधील शांक्सी प्रांतातील आढळलेल्या खालच्या जबड्याच्या अर्धवट हाडाच्या आधारे करण्यात आले असून नवीन अभ्यासात, संशोधकांनी या अवशेषांचे विश्लेषण चीनमधून नुकत्याच सापडलेल्या जीवाश्मांसोबत केले आणि कवटीची लांबी, दाढीची उंची, कवटी आणि मणक्याला जोडणाऱ्या हाडांच्या रचनेची रुंदी यांची तुलना केल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
या अहवालात सस्तन प्राण्यांमधील शरीराच्या वस्तुमानाचा अचूक अंदाज मानला जाणाऱ्या पद्धतीचा अवलंब करून विश्लेषण करण्यात आले असता यात आढळले की, एप्लेइस्टोसेनियसचे वजन कदाचित २९० पौंड म्हणजेच १३० किलोंपेक्षा जास्त होते आणि ते ४२० पौंड म्हणजे जवळपास १९० किलोपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी यात नमूद करतानाच हे चित्ते आकार आणि वजनाने आधुनिक काळातील वाघ किंवा सिंह या सारखेच असावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
म्हणजेच ते सुमारे ३४ ते ६४ किलो वजन असलेल्या आधुनिक आफ्रिकन चित्त्यापेक्षा वजनदार होते. नव्याने विश्लेषित केलेल्या जीवाश्मांमध्ये २०२१ मध्ये ईशान्य चीनच्या लिओनिंग प्रांतातील जिन्युआन गुहेतून सापडलेल्या दोन वरच्या जबड्याच्या हाडांचा समावेश आहे. तसेच १९३० च्या दशकात बीजिंगमधील झौकौडियनमध्ये सापडलेल्या कवटीचा समावेश आहे.
संशोधकांना असेही आढळून आले की, नामशेष झालेल्या विशाल चित्त्यांमध्ये आधुनिक आफ्रिकन चित्त्यांशी काही उल्लेखनीय समानता आहेत. उदाहरणार्थ, महाकाय चित्त्यांच्या दातांची मांडणी आणि नाकामागील हाडाची जागा आधुनिक चित्त्यांशी जुळत असल्याचे संशोधकांनी त्यांच्या निष्कर्षांमध्ये त्याचे वर्णनही केले आहे.