अहमदनगर बातम्या

शेतकऱ्यांसाठी रस्तेबांधणी ! शेतीतील रस्त्याची अडचण दूर, दोन हजार पाणंद रस्त्यांना मंजुरी तर ‘इतकी’ कामे प्रगतीपथावर, पहा सविस्तर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शासन शेतकऱ्यांप्रती नेहमीच जागरूक असते. विविध योजना आखत व त्याची अंमलबजावणी करत शासन शेतकऱ्यांचे जीव समृद्ध बनवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते.

याच प्रयत्नाचा एका भाग म्हणजे मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता योजना. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्त्या घेऊन जाणे हेच याचे उद्दिष्ट आहे.

पावसाळ्यात शेतकऱ्यास शेतीतून पायी मार्गस्थ होणेही अवघड असते. शेतीमालाची वाहतूकही करता येत नसल्याने मोठे नुकसान होत असते.

शिवाय उसासारखे नगदी पीकही केवळ वाहतुकीमुळे घेता येत नाही. त्यामुळे मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता योजनेतून रस्त्यांचे जाळे उभे राहत आहे.

काय आहे मातोश्री पाणंद योजना ?
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून आपल्या राज्यात राबविली जाते. या योजनेंतर्गत शेत पाणंद रस्ते बांधण्यासाठी ९ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.

किती कामांना मंजुरी
मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता योजनेंतर्गत २०२१ पासून आतापर्यंत १९९७ कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ग्रामपंचायतीमार्पत १३४१ कामे होणार आहेत, तर ५२८ कामे सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करणार आहे.

यातील २३० कामे ग्रामंपचायत स्तरावरून कोणत्या यंत्रणामार्फत करायची हे ठरवणे बाकी आहे, तर १२८ कामे शासन स्तरावरून दुरुस्त किंवा रद्द होणार आहेत.

या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होत चालली आहे.

काय होणार फायदा
या योजनेचा, या पाणंद रस्त्यांचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतशिवारातील हजारो शेतकऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहे, तसेच त्यांना शेतमालाची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे.

Ahmednagarlive24 Office