‘मी कोतकरचा भाऊ’ म्हणत सोने-नाणे लुटले, दुसऱ्या घटनेत ग्रामविकास अधिकाऱ्यासोबतच ‘असे’ काही..

अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात चोरी मारी,लूटमार आदी घटना घडताना दिसतायेत. आता अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत मी कोतकरचा चुलत भाऊ आहे, तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? आम्ही तुमचे तुकडे करून तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत दुचाकीचा धक्का लागल्याचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने दोघा जणांकडून एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, साडेआठ हजाराची रोकड असा ३८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटला असल्याची घटना समोर आली आहे.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात चोरी मारी,लूटमार आदी घटना घडताना दिसतायेत. आता अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत मी कोतकरचा चुलत भाऊ आहे,

तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? आम्ही तुमचे तुकडे करून तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत दुचाकीचा धक्का लागल्याचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने दोघा जणांकडून एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, साडेआठ हजाराची रोकड असा ३८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटला असल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी सुर्यभान दौलतराव तामखडे (वय ६२ रा. गांजीभोयरे ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुर्यभान हे त्यांचे व्याही गंगाराम भिकाजी घोगरे यांच्यासोबत दुचाकीवरून नगरकडे रूग्णालयात येत असताना

साडेदहाच्या सुमारास त्यांना केडगाव शिवारात औटी नर्सरीजवळ पाठीमागून आलेल्या एका अनोळखी दुचाकीस्वाराने अडवले. तुमच्या गाडीचा माझ्या गाडीला धक्का लागला आहे असे म्हणून तुम्हाला गाडी चालविता येते का? तुम्ही कोठून आला, तुमच्याकडे आधार कार्ड, लायन्सन आहे का?

सुर्यभान यांनी त्याला आधार कार्ड दाखवल्यानंतर तो त्यांना घेऊन काही अंतरावर गेला व त्याने मी कोतकरचा चुलत भाऊ आहे, तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? आम्ही तुमचे तुकडे करून तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत लुटले.

दुसऱ्या घटनेत ग्रामविकास अधिकाऱ्यास लुटले..
रस्त्यावर चारचाकी वाहन अडवून मी या गावचा दादा आहे, असे म्हणून एका आरोपीने ग्रामविकास अधिकाऱ्यास दमदाटी करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली. ही घटना दि. १५ रोजी पिंपळगाव रोडवर घडली. प्रभाकर सोमा चव्हाण (वय ५६, रा. संक्रापूर) हे राहुरी खुर्द येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून नोकरी करतात.

दि. १५ रोजी सायंकाळी प्रभाकर चव्हाण व त्यांचे भाऊ चारचाकी वाहनातून घरी जात होते. कोल्हार ते बेलापूर रोडवरील पिंपळगाव येथे आरोपीने चव्हाण यांची गाडी अडवून गाडीची चावी काढून फेकून दिली.

त्यानंतर चव्हाण यांना दमदाटी करून ७ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी सनी विजय बनसोडे (रा. पिंपळगाव फुणगी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe