Ahmednagar News : सत्ताधाऱ्यांनी आता अशीच तत्परता आपल्या उमेदवारावरील गुन्ह्यांच्या चौकशीसाठी दाखवावी; कोल्हे यांची टीका

Pragati
Published:

Ahmednagar News : माझ्यासारख्या युवकाला राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आमच्या संस्थावर विविध विभागाच्या धाडी टाकल्या. त्यांचा तो अधिकार आहे; परंतु कुठेही अनियमितता दिसून आलेली नाही.

आमच्या संस्थावर धाड सत्राइतकी तत्परता सत्ताधाऱ्यांनी आपल्या उमेदवारावरील गुन्ह्यांच्या चौकशीसाठी दाखवावी, अशी टीका नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विवेक कोल्हे यांनी सरकारवर केली.

नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी माघारी घ्यावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर येथील पथकाने लागोपाठ चार धाडी कोल्हे यांच्या संस्थावर टाकल्या. या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दि.२ जून, दि.७ जून, दि.११ जून व दि.१२ जून, अशी सलग १८ तास संस्थांची चौकशी करण्यात आली. संस्थेत अनियमित कामे होत नसल्यामुळे काही सापडले नाही. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकारी संस्था उभ्या केल्या.

गेल्या ६० वर्षात अशा धाडी कधी पडल्या नाहीत. सुट्टीच्या दिवशी दहा-दहा तास चौकशी करण्यात आली. सत्ताधाऱ्यांकडे असलेल्या खात्यामार्फत चौकशी करणे हा त्यांचा अधिकार आहे; परंतु हिच तत्परता त्यांनी त्यांच्या उमेदवारावरील गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी दाखवावी.

मुळात सभागृहात उद्धव ठाकरे सेनेला दराडे यांचा पाठिंबा आहे. उमेदवारी मात्र एकनाथ शिदे गटाकडून घेतली जाते. जे लोक पक्षश्रेष्ठीलाच फसवतात ते शिक्षकांना काय न्याय देणार? विद्यमान आमदारांवर असलेल्या क्रिमिनल व फसवणुकीसह गंभीर गुन्ह्यांचा पत्रकारांसमोर पाढा वाचताना २००१ साली साखर कारखाना काढण्यासाठी दोन कोटी शेअर्स विकले.

आजपर्यंत कारखाना उभा केला नाही, याची चौकशी होऊन शेअर्सधारकांना व्याजासह रक्कम द्यावी, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली. नामसाधर्म्य कोपरगावच्या किशोर दराडे अपहरण प्रकरणाची चौकशी व्हावी, आपली लढाई एका विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध आहे.

शिक्षक या आदर्श पेशा असलेल्या मतदारांच्या निवडणुकीत असे प्रकार घडत असल्याने मतदारांतही चिंता आहे. त्याचे परिणाम मतदानातून दिसून येतील. शिक्षकांच्या आग्रहाखातर आपण अपक्ष निवडणूक लढत आहोत.

त्यामुळे स्वाभिमानी शिक्षक मलाच साथ देतील. विखे यांच्या बरोबर इतर राजकीय मतभेद असले, तरी डॉ. राजेंद्र विखे अर्थात तात्या यांचे सहकार्य मला मिळेल. वैचारिक मतदारसंघातून लढाऊ युवक उमेदवार म्हणून मला पसंती आहे. मला सर्वांचीच मदत पाहिजे, असे देखील कोल्हे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe