अहमदनगर बातम्या

Ahmednagar News: देशाला दिशा देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने करावे! भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी शरद पवार यांचे प्रतिपादन

Published by
Ajay Patil

Ahmednagar News:- श्रीगोंदे तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे विद्यालय, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल या रयत शिक्षण संस्थांच्या सर्व शाखांच्या विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ ऑनलाईन पद्धतीने महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय या ठिकाणी पार पडला.

या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने  शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामाबद्दल गौरव उद्गार काढताना म्हटले की, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या रयत शिक्षण संस्था आधुनिक पद्धतीने काम करत असून या संस्थेने आता आधुनिकतेचा स्वीकार केलेला आहे.

त्यामुळे आता येणाऱ्या कालावधीत जेईई आणि नीट सारख्या परीक्षांकरिता आवश्यक मार्गदर्शन देखील या ठिकाणी केले जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की देशाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम रयत शिक्षण संस्थेने करावे अशा पद्धतीचे अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या कार्यक्रमानिमित्त व्यक्त केली.

 देशाला दिशा देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने करावेशरद पवार यांचे प्रतिपादन

महात्मा फुले यांनी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यांच्याकडे आरोपींना धरण खोदण्याची शिक्षा द्यावी, तसेच नवीन संकरित वाण व संकरित गायी निर्माण करण्याची मागणी केली होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पाण्यासाठी राधानगरी धरण, तर उद्योगासाठी उद्योगनगरी उभारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाक्रा नांगल धरण, बारमाही पाणी सुविधा आणि वीज निर्मिती व वितरण पॉवर ग्रेड निर्माण केले.

कर्मवीर भाऊराव पाटील या तिन्ही महापुरुषांचे वारसदार होते. देशाला दिशा देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे या सर्व शाखांच्या विविध कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभ ऑनलाइन पद्धतीने महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात झाला.

यावेळी पवार म्हणाले, की ‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्था आधुनिकतेचा स्वीकार करीत आहे. आधुनिक शिक्षण देण्याचे कार्य ‘रयत’च्या माध्यमातून चालू आहे.

येणाऱ्या काळात जेईई, नीट यांसारख्या परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. तालुक्यातील विविध शाखांच्या प्रगतीचा आढावा जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस यांनी घेतला.

आ. बबनराव पाचपुते यांनी आम्ही पक्षभेद विसरून ‘रयत’च्या मंचावर एकमुखाने काम करीत आहोत आणि करीत राहण्याचा शब्द दिला. ‘रयत’चे उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, मीना जगधने, डॉ. अनिल पाटील, विकास देशमुख, राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार उपस्थित होते.

दोन महिन्यात राज्यात येणार महाविकास आघाडीचे सरकार – शरद पवार

आ. रोहित पवार यांनी नेते कर्जत-जामखेड या दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असताना, विरोध कशासाठी करतात? मी महाराष्ट्राचे दौरे करीत आहे. प्रत्येक ठिकाणी महायुती सरकारबद्दल रोष दिसून येतो. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत आपले महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यानंतर ४५ मतदारसंघातील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.

विशेषतः येथील एमआयडीसीचा वंशज भूषणसिंहराजे होळकर,प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ज्येष्ठ शरद पवार यांनी दिली. खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर शनिवारी (२८ सप्टेंबर) आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

त्यात किल्ला जतन व संवर्धन सात कोटी रुप वखार महामंडळाच्या गोदाम बांधकाम तीन कोटी, खर्डा ते जामखेड रस्ता कोटींच्या कामांचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. खा. नीलेश लंके, आ. रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके, साहेबराव दरेकर, राहुल मोटे आदी उपस्थित होते.

आ. रोहित पवार म्हणाले, की आमदार होण्याअगोदर अनेक वेळा येथे आलो. त्यावेळी वाटले नाही की मी राजकारणात येईल, परंतु शरद पवार यांनी मला या मतदारसंघात लढण्यास सांगितले आणि काम करताना जनतेचा सेवक म्हणून काम कर, असा आदेश दिला, तसे काम केल्याचे पवार म्हणाले.

Ajay Patil