अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : चार मुलांचा बाप बनला सैतान ! मुलीवर केला अत्याचार, त्यानंतर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना अनेकदा समोर येतात. आता माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

स्वतःला चार मुले असताना देखील हा मुलांचा बाप सैतान बनलाय. एका अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केला. त्यानंतरही त्याने तिला त्रास देणे सुरु केले.

तौसिफ बागवान (वय ४२) असे या इसमाचे नाव आहे. तो कोपरगाव शहरातील रहिवासी आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तौसिफ बागवान (वय ४२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अधिक माहिती अशी : कोपरगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर चार मुलांचा बाप असलेल्या एका इसमाने नोव्हेंबर २०२३ पासून गोड बोलून अत्याचार केला होता. आरोपी तौसिफ बागवान व मुलीच्या घरच्यांची ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत, मुलीशी गोड़ बोलून त्याने गैरकृत्य केले होते.

त्यानंतरही मुलीस त्रास देऊ लागल्याने पीडित मुलीने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्रासाला कंटाळून आईसह तिच्या नातेवाइकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आरोपीविरुद्ध दि.१५ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच तौसिफ फरार झाला, मात्र पोलिसांनी त्याचा माग काढून त्यास बीड जिल्ह्यातून जेरबंद केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भामरे हे करीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता महिलांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे का असा प्रश्न पडतो.

Ahmednagarlive24 Office