अहमदनगर बातम्या

शाळकरी मुलीला वसतिगृहातून नेलं, शिर्डीत नेत अत्याचार केला, त्यानंतर पुन्हा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका विद्यार्थिनीस वसतिगृहातून शिर्डीला नेत तिच्यावर अत्याचार केलाय.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील २० वर्षीय विद्यार्थीनी श्रीरामपुरात शिक्षण घेत असून ती एका वसतिगृहात राहते.

सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी पीडित मुलीच्या ओळखीचा हर्षद अरूण गिरी, वय-२१, रा. बाभळेश्वर, ता. राहाता या तरूणाने तिला फोन करून तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे,

तू भेटायला ये, असे सांगून भेटायला बोलावले तेव्हा हर्षद तरूणीला मोटारसायकलवर बस आपल्याला बाहेर जायचे आहे, असे म्हणाला. तेव्हा मुलीने बसण्यास नकार दिला असता हर्षदने छोटी बाटली दाखवून तू माझ्यासोबत आली नाही तर औषध घेईल,

असे म्हणून मोटारसायकलवर तिला बसवून शिर्डी येथे घेवून गेला. सायं. ६ वा. शिर्डीमध्ये गेल्यानंतर एका हॉटेलमधील रूममध्ये नेवून मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. रात्रभर रूमवर

राहील्यानंतर मंगळवारी सकाळी शिर्डीहून हर्षदने पीडित मुलीला पुन्हा मोटारसायकलवर श्रीरामपूरकडे घेवून येत असताना तू हे जर कोणाला सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करील, तुझ्या घरच्यांनाही त्रास देईल, असे म्हणत जातीवाचक बोलून घरच्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हर्षदने सदर पीडित मुलीला तिच्या होस्टेलवर आणून सोडले.

याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी हर्षद अरूण गिरी याच्याविरूद्ध भारतीय न्यायसंहिता सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

 

Ahmednagarlive24 Office