Ahmednagar News : अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जगदंबा विद्यालय केडगाव या विद्यालयातील खेळाडूंनी विजयाची परंपरा कायम राखली. डॉजबॉल या क्रीडा प्रकारामध्ये 17 वर्षे वयोगट मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
जगदंबा विद्यालयाने क्रीडा विभागात पुन्हा एकदा बाजी मारली आहे. क्रीडा शिक्षक हराळ अशोक विठ्ठल यांनी मुलींच्या संघाला योग्य प्रशिक्षण देत हे यश संपादन केले आहे. गतवर्षीही विद्यालयाच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकत विभाग स्तरावर निवड झाली होती.

jagadamba
विद्यार्थी खेळाडूंना संस्थेचे सचिव सचिन भानुदास कोतकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर यांनी इतर स्पर्धेतही आपल्या विद्यालयाचे मुले असेच यश संपादन करतील असे प्रतिपादन करत खेळाडूंचे कौतुक केले.