Ahmednagar News : वेठबिगारी, त्यातून होणारे अत्याचार आदी गोष्टी समाजाला कलंक. अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात असे प्रकार समोर आले, पोलिसांनी त्यांची सुटकाही केली. पण तो पर्यंतचा प्रवास काळीज हेलवणारा होता. खाकी वर्दीची कृपा व मानव सेवा प्रकल्पाची मदत आदींमुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या.
बेलवंडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मे २०२३ व डिसेंबर २०२३ मध्ये वेठबिगारांवर कारवाई करत सुमारे २३ पीडितांची सुटका करत सर्वांना पिडित सांभाळ तथा पुनर्वसनासाठी अरणगाव येथील मानव सेवा प्रकल्पामध्ये श्रीगोंदा न्यायालयाचा आदेश प्राप्त करून ठेवले होते.

त्यापैकी ७ पीडित जे अत्याचार झाल्यामुळे मनोरुग्ण झालेले होते त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मान्य न्यायालयाचा आदेश घेऊन त्यांना स्वग्रही पाठविण्यात आले. यातील पीडित सिद्धार्थ रॉय यांच्या नातेवाईकांचा बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल खेडकर यांनी पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन सिद्धार्थ रॉय
याला न्यायालयाच्या आदेशाने त्याची बहीण इशाका रॉय, भावजी सुभाशिस दास, रा. काकिनारा, नारायणपूर, उत्तर, वेस्ट बंगाल यांचे ताब्यात दिल्याने सुमारे ११ वर्षानंतर बहिण, भावाची भेट घडून आली. वेठबिगारीच्या त्रासाने मनोरुग्ण झालेल्या वेस्ट बंगाल येथील सिद्धार्थ रॉय याला न्यायालयाच्या आदेशाने बेलवंडी पोलिस आणि मानव सेवा प्रकल्प अरणगाव यांनी त्याची बहीण इशाका रॉय हिच्या ताब्यात दिले.
सुमारे ११ वर्षानंतर बहिण भावाची भेट घडवून आणल्याने बेलवंडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि मानव सेवा प्रकल्प अरणगाव यांच्या प्रयत्नांना यश आले.
या भेटीसाठी बेलवंडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि मानव सेवा प्रकल्प अरणगाव यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. त्याच्या नातेवाईकांनी बेलवंडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह बेलवंडी पोलिस ठाण्याचे सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मानव विकास प्रकल्पाचे शिराज शेख व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.