Ahmednagar News : पाणी टंचाईच्या झळा तीव्र ; मुळा धरणाचे पोट खपाटीला, अवघा साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा

Ahmednagarlive24 office
Published:
mula dam

Ahmednagar News : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत ‎आहे, नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात‎ सोमवारी सायंकाळपर्यंत मुळा धरणात ६ हजार ४९१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने धरणातुन प्रादेशिक पाणी पुरवठा होत असलेल्या योजनांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

नगर शहरासह विविध पाणी पुरवठा योजनांसाठी जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणाची २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत धरणात ६ हजार ४९१ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली होती. मात्र विविध पाणी पुरवठा योजनांसाठी व सध्या वाढत्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे रोज एकूण १६ दशलक्ष घनफूट पाणी धरणातून खर्च होत आहे.

सध्या २४.९६ टक्के शिल्लक पाणी साठ्यातून राहुरी, बारागाव नांदूर व इतर १५ गावे, सोनई करजगाव व इतर १८ गावे, मिरी माका व इतर २९ गावे, बुऱ्हाणनगर व इतर ४८ गावे या ९ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी ३१ जुलैपर्यंत लागणाऱ्या पाण्याचे मुळा पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नियोजन केले जात आहे. धरणातील पाण्याचा मृतसाठा ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट असल्याने शिल्लक १९९१ दशलक्ष घनफूट पाण्यातून धरणावर अवलंबून असलेल्या ९ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी पुरवठा सुरू आहे.

९ पाणी योजनांसाठी दैनंदिन ८ दशलक्ष घनफूट, तर बाष्पीभवन ८ दशलक्ष घनफूट असे १६ दशलक्ष घनफूट पाणी धरणातून खर्च होत आहे. नगर शहराची लोकसंख्या दिवसें दिवस वाढत आहे. त्यामुळे मनपाकडून सर्व नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही.त्यातच सध्या धरणातच पाणी कमी असल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे.सध्या चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यंदा ७ जूनला पावसाळ्यातील खात्रीच्या मृग नक्षत्रास सुरुवात होणार आहे.

७ जूनला पावसाळ्यातील खात्रीच्या मृग नक्षत्रास सुरुवात होणार आहे. मागील वर्षी ११ जूनला पहिल्या पावसाची सुरुवात होऊन एकाच दिवसात २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र तब्बल १४ दिक्स पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. १५ जून २०२३ रोजी एकाच दिवशी झालेल्या ४१ मिलीमीटर पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परिणामी घटत्या पाणी साठ्यामुळे वेळेवर पाऊस पडावा अशी सर्वजण अपॆक्षा करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe