Ahmednagar News : लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन एका १७ वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ यादरम्यान हा प्रकार घडला.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. निखिल सुनील दळवी (रा. आरणगाव, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

पीडिता अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेला हॉटेलवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले आणि नंतर लग्नास नकार दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
निखील याने दुचाकीवरून फिर्यादी अल्पवयीन मुलीला नोव्हेंबर २०२३ (तारीख नाही) ते २८ जून २०२४ दरम्यान वेळोवेळी कल्याण रस्त्यावरील जाधव मळा परिसरातील एका लॉजवर, नगर – पुणे महामार्गावरील चास (ता. नगर) शिवारातील एका लॉजवर
व नगर – जामखेड रस्त्यावरील दरेवाडी शिवारातील एका लॉजवर नेले. तेथे तिच्यासोबत इच्छेविरूध्द, बळजबरीने संबंध ठेवले. फिर्यादीने त्याच्याकडे लग्न करण्याबाबत इच्छा व्यक्त केली असता जातीवाचक
बोलून तुझ्यासोबत लग्न करता येणार नाही असे म्हणून लग्न करण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने सदरचा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशा घटना समाजासाठी कलंक असून हा चिंतेचा विषय आहे.
यावर पोलिसांनी वेळीच कारवाई करत गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना वेळीच धडा शिकवला पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.