Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान येथे भव्यदिव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाला दहिहंडी उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत दि 26 ऑगस्ट रोजी सोमवारी साजरा करण्यात आला.
प्रारंभी सकाळी शिनाई मातेस व श्रीकृष्ण भगवंतांना श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी व उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. नंतर जन्मोत्सव साजरा करताना श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी, उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज, युवानेते उदयन गडाख, सुनील गडाख, किशोर जोजार यांच्या हस्ते देवाच्या पाळण्याची दोरी ओढण्यात आली
व गावातून सवाद्य भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली सर्व मंडळांच्या वतीने दहिहंड्या बांधण्यात आल्या होत्या. महंत आवेराज महाराज व गोविंदांच्या हस्ते गावातील ठिक ठिकाणच्या दहिहंड्या फोडण्यात आल्या त्या नंतर देवस्थान महाद्वारात मानाची काल्याची दहिहंडी श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी, उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज, महंत सुधाकर बाबा येळमकर यांच्या हस्ते फोडण्यात आली. तदनंतर हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.
या सोहळ्यासाठी महंत गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज, आमदार शंकरराव गडाख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. सोमवारी रात्री 12 वाजता भगवंतांच्या जन्मोत्सवाची महापूजा श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी व उत्तराधीकारी महंत आवेराज महाराज यांच्या बरोबर पूजा करण्यासाठी भाविक भक्त किशोरभाऊ जोजार,
बाळासाहेब भनगे, बबन अप्पा भणगे, माऊली क्षिरसागर, रमेश गुणवंत, भाऊसाहेब बनकर, बाळासाहेब पेहरे, कानिफनाथ गोडसे , भिवसेन भणगे, रमेश श्रीधर, महेश देवतरसे, विजय पटारे, विलास मोहिटे, पोपटराव शेकडे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.