Ahmednagar News : ‘संपदा’च्या काही धक्कादायक गोष्टी..३२ वेळा एकालाच सोनेतारण कर्ज, कर्जदारांच्या १५७, संचालकांच्या १२ मालमत्ता जप्त, काही संचालकांचा तर वेगळाच खुलासा..

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : संपदा पतसंस्थेचा प्रकार म्हणजे सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना आहे. यातील मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारेसह पाच जणांना जन्मठेप झाली. इतरांना कमीअधिक शिक्षा झाल्या.

अहमदनगरमध्ये एखाद्या पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेप होणे ही पहिलीच घटना आहे. दरम्यान यातील अनेक बाजू तपासात समोर आल्या तर काही काही ठेवीदार आता काही गोष्टी समोर आणत आहेत.

एकाच कर्जदाराला तब्बल ३२ वेळा दिलेय सोनेतारण कर्ज
या पतसंस्थेतून एकाच कर्जदाराला २७ ते ३२ वेळा सोनेतारण कर्ज देण्यात आलेले आहेत. एकाच वेळी एवढ्यावेळा एकाच व्यक्तीला कर्ज कसे दिले गेले. लेखापरीक्षणात ही बाब समोर का आली नाही? असे एक ना अनेक प्रश्न सध्या ठेवीदार व इतर काह लोक उपस्थित करत आहेत.

कर्जदारांच्या १५७, संचालकांच्या १२ मालमत्ता जप्त
अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफारे, यांच्यासह अन्य संचालकांच्या १२ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच कर्जदारांच्या १५७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती समजली आहे.

..आम्ही फक्त सह्या केल्या बाकी आम्हाला काही माहितीच नाही
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेची ज्ञानदेव वाफारे याने स्थापना केली. पण, त्याचा कागदोपत्री कुठेही उल्लेख येऊ दिला नाही. त्याने चेअरमन म्हणून दुसऱ्यालाच बसविले, तर पत्नी सुजाता हिला उपाध्यक्ष केले. या दोघांच्या माध्यमातून वाफारे याने कारभार केला.

पुढे तो स्वतः चेअरमनही झाला. कारभार त्याच्या हातात असला तरी सहकाराच्या नियमानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अशा नियुक्ती करणे बंधनकारक असते. त्यामुळे त्यांने नातेवाइक, मित्र, परिवार, काही सेवानिवृत्त शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांना कागदोपत्री संचालक करून घेतले.

त्यांनीही वाफारे म्हणेल तिथे स्वाक्षऱ्या केल्या. अगदी त्याची पत्नीही त्याला अपवाद नाही. तिनेही आपण केवळ सह्या केल्याची कबुली न्यायालयात दिली. अशीच कबुली संचालक व काही कर्जदारांनीही दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe