अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कुकडी नदीत लवकरच बोटिंग ! जगाला भुरळ घालणाऱ्या रांजणखळग्यांसाठी होणार ‘ही’ कामे

Published by
Ahmednagarlive24 Office

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड , रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहेत. हे पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येत असतात.

आता याठिकाणी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कुकडी नदीत पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदी तीरावर पारनेर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला निघोज गाव आहे. निघोजमध्ये मळगंगा देवीचे जागृत देवस्थान आहे.

तेथूनच ३ किलोमीटर अंतरावर कुंड पर्यटन क्षेत्र येथे भव्य कुंडमाऊलीचे दुसरे मंदिर आहे. या कुंड पर्यटन क्षेत्र येथे नदीच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारचे रांजणखळगे आहेत.

या ठिकाणी रांजणखळग्याचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून भूगर्भ शास्त्राचे अभ्यासक, पर्यटक येतात. कुंड पर्यटन क्षेत्र येथे भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याची सुविधा,

पर्यटकांसाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पातव्याची सुविधा अशी विविध विकासकामे झालेले आहेत. लवकरच येथे विसावा केंद्र, भोजन कक्ष व कुकडी नदीत पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा, अशी विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत.

निघोजची खरी ओळख ही आई मळगंगा देवीमुळे आहे. कुंड पर्यटन क्षेत्र येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यांची ३० वर्षापूर्वी गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली.

तेव्हापासून देशासह विदेशातून पर्यटकांची ये-जा वाढली. चैत्र महिन्यात दहा दिवस चालणारा यात्रोत्सव भाविकांसाठी पर्वणीच असतो असे येथील नागरिक सांगतात.

या ठिकाणी रांजणखळग्याचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून भूगर्भ शास्त्राचे अभ्यासक, पर्यटक येतात. रांजणखळग्यांमध्ये साधारण ५० वर्षापासून ‘क्लिफ स्वालो’ पक्ष्यांची वसाहत आहे. कुंड पर्यटन क्षेत्र येथे भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पर्यटकांसाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पातव्याची सुविधा अशी विविध विकासकामे झालेले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office