Ahmednagar News : कारवाईला सुरवात ! ‘संपदा’च्या संचालकांच्या मालमत्तांचे लिलाव करून ठेवीदारांना देणार पैसे, कर्जदारांच्या मालमत्ताही होणार जप्त

Ahmednagarlive24 office
Published:
COURT

Ahmednagar News :   संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा हा राज्यभर गाजला. आता या घोटाळ्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वाफारेसह १७ जणांना न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली. त्यांच्या कृत्याची शिक्षा त्यांना झाली असल्याने ठेवीदार समाधानी आहेत.

आता त्यांच्या ठेवी देखील मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे. संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून त्यातून ठेवीदारांच्या रकमा परत करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती अवसायक मंडळाने दिली आहे.

ठेवीदारांना अद्याप किती ठेवी देणे आहे शिल्लक?
संस्थेत ठेवीदारांच्या सुमारे ३२ कोटींच्या ठेवी अडकल्या असून प्रशासकीय काळात काही प्रमाणात वसूली होऊन त्यातून ठेवींच्या रकमा परत करण्याची कार्यवाही करण्यात आली. मागील दोन वर्षात २ ते ३ कोटी रूपयांच्या ठेवींची रक्कम परत करण्यास अवसायक मंडळाला यश आले आहे. मात्र अद्यापही २८ ते ३० कोटी रूपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.

संस्थेची स्वतःची कोणतीही मालमत्ता नाही, मग ठेवी कशा मिळणार?
न्यायालयाच्या निकालाने ठेवीदारांना ठेवी परत मिळू शकतात, अशी एक नवी आशा निर्माण झाली आहे. त्यासाठी सध्याचे अवसायक मंडळ प्रयत्नशिल आहे. संस्थेवर सहाय्यक निबंधक डी.ए. घोडेचोर यांच्या अध्यक्षतेखाली अवसायक मंडळ नियुक्त असुन या अवसायक मंडळाने संचालक, कर्जदारांवर कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबत वसूलीवर भर दिला आहे. म्हणजे संस्थेची स्वतःची कोणतीही मालमत्ता नाही.

त्यामुळे दोषी संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढवणे, त्या जप्त करून त्याचा लिलाव करणे आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या रकमेतून ठेवींच्या रकमा परत करणे हा पर्याय अवलंबण्यात येत आहे. त्याचबरोबर थकबाकीदार कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला जाणार असून त्यातून कर्जाची वसूली केली जाणार आहे.

दरम्यान संचालकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मालमत्ता जप्ती, लिलाव ही प्रक्रिया राबविण्यात येत असून ही प्रक्रिया किचकट असल्याने त्यास मोठा अवधी जात आहे. ठेवीदारांनी अशा लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा, लिलावातून रकमा वसूल करून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाणार आहेत. त्यासाठी कायदेशीर प्रकिया राबवून कार्यवाही केली जात असल्याचे अवसायक मंडळाचे अध्यक्ष घोडेचोर यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe