अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : दगडाने सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पावणेदोन लाखांचे बियाणे चोरले ; नगर जिल्ह्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आतापर्यंत सोने, चांदी, वाहने तसेच मौल्यवान वस्तू , शेतकऱ्यांच्या शेतातील उभी असलेली तूर, सोयाबीन, कापूस,डाळिंब, संत्री यासह इतर पिकांची चोरटयांनी चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता दगडाने सीसीटीव्ही कॅमेरे फोडून थेट दुकानातूनच बियाणे चोरी केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे घडली आहे.

आज दुकान, घर अथवा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात. मात्र तेरी देखील चोरीच्या घटना घडतात. अशीच कृषी सेवा केंद्रातुन चक्क पावणेदोन लाखांचे बियाणे चोरी केली आहे. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई रस्त्यालगत असलेल्या एका कृषी सेवा केंद्राचे शटर तोडून चोरट्यांनी पावणेदोन लाखांचे कपाशी बियाणे व रोख रक्कम लंपास केली. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी परिसरात लाइट नसल्याने अंधाराचा फायदा घेत शटर तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील इन्व्हर्टरचे बटण बंद करूनसीसीटीव्हीसह दुकानातील वीजपुरवठा खंडित केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी हि चोरी करण्यापूर्वी आपण कोणालाही ओळखू नये यासाठी आधी रुमालाने अर्धवट तोंड बांधून घेतले. त्यानंतर हातातील गलोलीतून कृषी सेवा केंद्राच्या समोर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर दगडांचा मारा केला. यातील काही दगड सीसीटीव्ही कॅमेऱ्याला लागले. त्यानंतर एका कॅमेऱ्यावर तर चक्क रिकामी गोणी टाकून सीसीटीव्ही झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानातील दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून याप्रकरणी शेवगाव पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office