Ahmednagar News : सध्या अनेकदा किरकोळ गोष्टीवरून वाद होतात. त्याचे पर्यावसन मोठ्या स्वरूपाच्या भांडणात तर कधी कधी एखाद्याचा खून देखील करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच किरकोळ वादातून एकावर चौघाजणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
‘तू’ माझ्याकडे नेहमी खुन्नस ने का बघत असतो, आज तुझी मस्ती जिरवतो, असे म्हणत चौघाजणांनी एक तरुणावर कोयता, चाकूने जीवघेणा हल्ला करून काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात आशोक म्हस्के हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या दोन्ही हातावर कोयतने व इतर ठिकणी चाकूने गंभीर वार केले आहेत. हि घटना जामखेड येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, अशोक रतन म्हस्के (वय २३), (रा. कोल्हेवस्ती, जामखेड) हा सायंकाळी जामखेड शहरातील डेअरीला दूध घालून मोटारसायकलने कोल्हे वस्ती येथे घरी चालला होता.
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकानासमोर प्रमोद प्रविण घायतडक (रा. कोल्हेवस्ती), सलमान आत्तार (पुर्ण नाव माहीत नाही), रोहित शिवाजी गायकवाड व चाँद नुर उर्फ आयन शेख (रा. जामखेड), या चौघाजणांनी म्हस्के याची मोटारसायकल अडवून गाडीची चावी काढुन घेतली.
या वेळी अशोक त्यांना म्हणाला तुम्ही मला का थांबवले. तो असे असे म्हणताच तू माझ्याकडे नेहमी खुन्नस ने का बघत असतो, आज तुझी मस्ती जिरवतो, असे म्हणत प्रमोद घायतडक याने त्याच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केले. तर सलमान अत्तार याने हातातील चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अशोकच्या कंबरेत चाकूने वार केले.
यात अशोक म्हस्के हा गंभीर ताखमी झाला. मात्र हे चौघे एवढ्यावरच थांबले नाहीत, जखमी झाला रोहित शिवाजी गायकवाड व चाँद नुर उर्फ आयन शेख या दोघांनी त्यास त्यांच्या हातात असलेल्या काठ्यांनी बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात आशोक म्हस्के हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्थनिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसानी वरील चौघांना ताब्यात घेतले आहे.