Ahmednagar News : राज्यासह जिल्ह्यात मान्सूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाला आहे. या पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली दिसून आली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवारी नगर तालुक्यात अनेक भागात दमदार पाऊस झाला.परंतु अनेक भागात पाऊस व वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.
मृग नक्षत्रावर पाऊस होत असल्याने एकीकडे समाधानाचे वातावरण असतानाच दुसरीकडे घरांची पत्रे उड्डून जाने, झाडे पडणे, विजेचे खांब वाकणे अशा घटना घडत आहेत. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर ओल झाली आहे त्यामुळे काही कालावधीत वाफसा झाल्यानंतर शेतकरी पेरण्या करतील.
वादळी पावसाने कोपरगाव तालुक्याला झोडपून काढले. यात अनेक घरांची पडझड झाली असून कांदाचाळींचे देखील नुकसान झाले आहे. तालुकयातील वेगवेगळ्या गावांमध्ये मोठमोठी वृक्ष मुळासकट उन्मळून पडली आहेत. मात्र तालुक्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही.
मृग नक्षत्रावर पाऊस होत असल्याने वेळेवर पेरण्या करता येतील यामुळे शेतकरी समाधानी आहे तर दुसरीकडे घरांची पत्रे उडणे, कांदा चाळीचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना बसत आहे. तर झाडे पडणे, विजेचे खांब वाकणे, विजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.
तालुक्यातील कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी, माहेगाव देशमुख, वारी, रवंदे, कोकमठाण व पोहेगाव आदी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात सुरेगाव येथील एक शेतकऱ्याचे कांद्याचे शेड पूर्णपणे पडले, तर तीन ते चार ज्यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचा संसार आता उघड्यार आला आहे.
एकाच्या घराशेजारी असलेले मोठे पिंपळाचे झाड घरावर पडून घराचे नुकसान झाले आहे.यात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान कोपरगाव- ३.८ मिमी, रवंदे २७ मिमी, दहेगाव बोलका २.३ मिमी, पोहेगाव २५.३ तर सुरेगाव मंडळात ३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.