अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शेतीच्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून दहाजणांनी घरात घुसून दामोदर गणपत घुले यांच्यासह त्यंचे आई,वडील व भावास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी दामोदर घुले यांच्या फिर्यादीवरून सुरेश श्रीपत घुले,विठ्ठल श्रीपत घुले,बाळासाहेब श्रीपत घुले,रामेश्वर बाळासाहेब घुले,दीपक बाळासाहेब घुले,मनोज अरूण घुले,राहुल अरूण घुले,संगीता अरूण घुले,संकेत अरूण घुले सर्व रा.तळणी यांच्या विरूध्द शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.