अहमदनगर बातम्या

विद्यार्थ्यांचा जीव मुठीत ! तब्बल ‘इतक्या’ शाळा खोल्यांची दुरवस्था, अपघाताचा धोका? पहा अहमदनगरमधील शाळांची सद्यस्थिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर. विद्यार्थी येथे आपले शालेय शिक्षण घेत असतात. परंतु जिल्ह्यातील काही शाळांमधील खोल्या अत्यंतर दुरावस्था झालेल्या असल्याची माहिती समजली आहे. जिल्ह्यातील तब्बल १ हजार ६८० शाळा खोल्यांची दुरवस्था झाली आहे.

दरम्यान, नवीन शाळा खोल्यांसह दुरुस्तीला देखील निधी मंजूर झाला आहे. परंतु प्रत्यक्षात दुरुस्ती व नव्याने बांधकाम कधी होईल, हे सांगणे कठीण आहे. नगर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात ३ हजार ५४५ शाळा आहेत.

तर या शाळांमध्ये १३ हजार २५४ शाळा खोल्या आहेत. त्यापैकी ७०४ शाळा खोल्या पाडून नव्याने तेथे शाळा खोल्या उभारण्याची तातडीने गरज आहे. तर ९७६ शाळा खोल्यांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. १३ हजार २५४ शाळाखोल्यापैकी १ हजार ६८० शाळा खोल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य नाहीत.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा असल्याने तेथे आवश्यक त्या सुविधा व सुधारणा करण्यात आल्या. त्यात वीज, पाणी, गळणारे पत्रे दुरुस्त, रॅप्प आदी सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या.

या सर्व सुविधा ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यास सांगण्यात आले होते. मात्र हे काम बहुतांशी ठिकाणी ताप्तपुरते करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शाळांमध्ये प्राथमिक सुविधा देण्यावर भर द्यावा लागणार आहे.

तालुकानिहाय खोल्यांची दुरुस्ती गरजेची
जिल्ह्यात ९७६ शाळा खोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. नगर : १४५, श्रीगोंदा ७३, पारनेर : ६, शेवगाव : २८, पाथर्डी ३६, जामखेड : १८७, कर्जत : ३४, अकोले ५६, संगमनेर ७२, राहाता : ३७, श्रीरामपूर : ६३, राहुरी : १२०, नेवासा : ४८, कोपरगावः ७१.

तालुकानिहाय शाळा खोल्यांची आवश्यकता
जिल्ह्यात नव्याने ७०४ शाळा खोल्यांची आवश्यकता आहे. सर्वाधिक नेवासा तालुक्यात १०६ शाळाखोल्यांची गरज आहे. नगर : ४४, श्रीगोंदा : १०५, पारनेर: ४७, शेवगावः ५०, पाथर्डी : ७९, जामखेड ९८, कर्जत : ५, अकोलेः २०, संगमनेर : ३७, राहाता १२, श्रीरामपूर ३०, राहुरीः २८, कोपरगाव : ४३.

Ahmednagarlive24 Office