Ahmednagar News : आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व भाविक पंढरपूरच्या दिशेने वारी करत आहेत. यातच जगदंबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस आपल्या विद्यालय परिसरामध्ये पांडुरंगाची दिंडी काढली.
या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक वेगवेगळ्या वेशभूषेत साधुसंतांच्या अभंगात आणि टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक गुणांची जोपासना व्हावी म्हणून या दिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थांनी फुगडी घालत,

dindi
लेझिम खेळत वारीचा आनंद लुटला. या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने श्री विनोद लगड यांनी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला तर कराळे ताई यांनी छोट्या वारकऱ्यांना खाऊ वाटप केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर, विज्ञान शिक्षक शरद मंडलिक, क्रीडा शिक्षक हराळ अशोक यांनी या दिंडीचे नियोजन केले.