अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : विद्यार्थीनीस कॅफेत नेत सामूहिक अत्याचार, तिघे फरार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : एका कॅफेमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समजली आहे. तिघे आरोपी फरार झाले आहेत. एका कॅफेमध्ये विद्यार्थीनीला नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक म्हणजे म्हणजे या विद्यार्थीनीला श्रीरामपूरनंतर शिर्डीमध्ये नेवून तेथेही तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. यातील अत्याचार करणारे तिघेही आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या शिरसगाव आणि माळेवाडी येथील असल्याची माहिती समजली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या एका कॅफे मध्ये  एका १७ वर्ष वयाच्या तरुणीवर दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगीक अत्याचार करत अत्याचार केला. तर याच विद्यार्थीनीवर शिर्डीतील एका हॉटेलमध्ये नेत एका आरोपीने बळजबरीने अत्याचार केला.

अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामुहीक अत्याचार केला म्हणून पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी ललीत, रा शिरसगांव, अनिकेत व महेश, दोघे रा. माळेवाडी या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे, पोनि. नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून सपोनि. आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, घटनेतील तीनही आरोपी फरार झाले आहेत. शहर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणात आणखी काही जणांना आरोपी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी हे विद्यार्थिनीचे परिचित आहेत. जिल्ह्यातील अत्याचारासंदर्भात घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे. पोलिसांनी यावर कडक कारवाई करत गुन्हेगारांवरही कडक कारवाई करण्याची अपेक्षा जनता करत आहे.

 

Ahmednagarlive24 Office