अहमदनगर बातम्या

जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान ! नागरिक काकुळतीला, पहा किती रुग्ण?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : बदल्यात हवामानाने अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे. सतत पावसाची रिपरिप व वाढल्यामुळे शहरासह तालुक्यात सर्दी व हिवतापाचे रुग्ण वाढले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी प्रमुख लक्षणे या रुग्णांमध्ये जाणवत आहेत.

तसेच जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. अकोले तालुक्यात चार स्वाइन फ्लूचे व सात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, तालुका आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. डेंग्यूचे सातपैकी पाच रुग्ण बरे झाले असून, दोन रुग्ण उपचार घेत आहेत. हिवरगाव,

परखतपूर दोन असे चार स्वाइनचे रुग्ण निदर्शनास आले आहेत. संगमनेर येथे उपचार घेत आहेत. पारनेर तालुक्यातील निघोज, टाकळी ढोकेश्वर, रुई छत्रपती, खडकवाडी या गावांसह परिसरात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.

खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डेंग्यूचे तीन, तर भाळवणी आरोग्य केंद्रांतर्गत दोन, रुई छत्रपती प्राथमिक केंद्रांतर्गत एक डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. बदल्यात हवामानाने ताप,

सर्दी, खोकला अशी प्रमुख लक्षणे या रुग्णांमध्ये जाणवत आहेत. बदलत्या वातावरणाचा परिणाम या रुग्णांवर जाणवू लागला आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, निमोनियाचे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातही उपचार घेत आहेत.

चिकुनगुनियाचे थैमान
विविध तालुक्यात सध्या चिकुनगुनियाचे रुग्ण वाढेल आहेत. पारनेर तालुक्यासह नगर तालुक्यातही हे रुग्ण सर्वाधिक आहेत. ताप, सर्दी, खोकला, हात-पाय सुजणे, सांधेदुखीसारख्या वेदना, थकवा अशी लक्षणे या रुग्णांमध्ये आढळून येत आहेत.

कोरडा दिन पाळा
उघड्या पाण्याच्या टाक्या, जुने टायर, नारळ कवट्या याकडे लक्ष द्यावे. नागरिकांनी आठवड्यातून एक दोनदा कोरडा दिन पाळावा. तणनाशक, मच्छर औषध फवारणी, धूर फवारणी करावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office