अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमधून सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  विविध अपघातांच्या घटनांची मालिका सुरु असतानाच आता एक मोठी अपडेट आली आहे. अहमदनगरमधून सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागण्याची घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे.

मागील काही दिवसांपासून वाहने जळण्याच्या, वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडलेल्या असतानाच आता ही बातमी समोर आली आहे. हा टेम्पो ट्रॅव्हलर शिर्डी येथून भाविकांना घेऊन सप्तश्रृंगी गडाकडे चाललेला होता. हा टेम्पो ट्रॅव्हलर घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ आला असता अचानक आग लागली.

ही घटना सोमवारी रात्री घडली असल्याची माहिती मिळाली आहे. या लागलेल्या आगीमध्ये हा टेम्पो ट्रॅव्हलर जळून भस्मसात झाला. भाविकांनी प्रसंगावधान राखून तत्काळ गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे या अपघातामध्ये कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलरच्या इंजिनमधून अचानक धूर आला. ही गोष्ट लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखले. त्याने गाडी तत्काळ रस्त्याशेजारी थांबवत उभी केली. त्यानंतर प्रवाशांना माहिती दिल्याने प्रवासी देखील तातडीने वाहनाच्या बाहेर पडले.

त्यानंतर काही क्षणांतच गाडीने पेट घेतला. यावेळी या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी या घटनेची माहिती ट्रस्ट व ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थ, ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व रोप वे ट्रॉलीचे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्रासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यातून सर्वच प्रवासी बालंबाल बचावले आहेत.

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात बुडून एकाचा मृत्यू
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तालुक्यातील अंभोरे परिसरात घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, निळवंडे उजव्या कालव्याला गेल्या काही दिवसांपासून पाणी सुरु आहे.

अंभोरे येथील उजव्या कालव्याच्या जवळ रहात असलेला राधाकिसन विठोबा खेबनर, वय ४३ हा पाटाच्या कडेने आपल्या घराकडे जात होता. अचानक तोल गेल्याने तो पाटाच्या पाण्यात पडला. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. सोमवारी सकाळी पाटाच्या कडेने जाणाऱ्या दूध उत्त्पादक शेतकऱ्यांनी पाईपला अडकलेला मृतदेह पाहिला

Ahmednagarlive24 Office