Ahmednagar News : दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. हे काम या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. या मार्गावरील अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे बाकी आहेत. काही कामे रेल्वेगाड्या सुरु असताना देखील केली जातात तर काही कामे करण्यासाठी मात्र रेल्वेगाड्या पर्यायी मार्गाने वळवाव्या लागतात.
याच मार्गाचे कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव ते पुणतांब्यादरम्यान प्री-नॉन इंटरलॉकिंगचे काम बाकी होते , त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल दहा दिवसांचा ‘मेगाब्लॉक’ घेण्यांत आला आहे.
त्यामुळे पुढील दहा दिवस म्हणजे दि. २८ जूनपर्यंत या मार्गावर धावणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींच्या – मार्गात बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वे विभागातर्फे ही माहिती देण्यात – आली. दौंड मनमाड या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल.
या मार्गावरून दररोज २८ रेल्वेगाड्या धावतात त्यातून सुमारे ७० हजार प्रवासी प्रवास करतात. या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्गावरून रेल्वे सेवा आणखी सुकर होईल.
‘या’ रेल्वेगाड्या केल्या रद्द
वीरांगणा राणी लक्ष्मीबाई झांशी (२६ जून), झाशी स्पेशल (२० व २७ , जून), नांदेड-हडपसर स्पेशल, हडपसर नांदेड (२० जून), जबलपूर-पुणे (२३ – जून), पुणे-जबलपूर स्पेशल (२४ जून), या मुंबईहून शिर्डीकडे व शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या साईनगर शिर्डी व वंदे भारत एक्सप्रेस (२९ व ३० जून), दादरहून- साईनगर शिर्डीला व शिर्डीहून दादरला जाणारी साईनगर साप्ताहिक सुपरफास्ट (२८ व २९ जून), त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट (२९ व ३० जून), दादर- साईनगर शिर्डी-पुणे मार्गे (२९ जून) व साईनगर शिर्डी-दादर (३० जून)
‘या’ गाड्यांचा बदलला मार्ग
२५ ते २९ व २६ ते ३० जूनपर्यंत पुणे-नांदेड व नांदेड-पुणे एक्सप्रेस कुरूडवाडी, लातूर, परळी, परभणीमार्गे धावेल. २७ व २८ जून रोजी जम्मू तावी-पुणे झेलम एक्सप्रेस इगतपुरी, कल्याण, पनवेलमार्गे पुण्याला जाईल. २८ व २९ जून रोजीची हजरत निजामुद्दिन वास्को गोवा एक्सप्रेस इगतपुरी, कल्याण, पनवेलमार्गे धावेल.