अहमदनगरमधील खून, अत्याचारासह अनेक गुन्हे असणाऱ्या ‘त्या’ ‘सराईत गुन्हेगाराचा भयंकर अंत… निर्घृण हत्या…

अहमदनगर जिल्ह्यातील खून, महिलांवर अत्याचारासह अनेक गुन्हे असणाऱ्या असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराचा भयंकर अंत झाल्याची घटना घडली आहे. धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील खून, महिलांवर अत्याचारासह अनेक गुन्हे  असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराचा भयंकर अंत झाल्याची घटना घडली आहे. धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

उमेश नागरे असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अत्याचार, अवैध गांजा विक्री, खून, सरकारी कामात अडथळा आणणे अशा विविध प्रकारचे गुन्हे लोणी, कोपरगाव व जामखेड तसेच जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.

उमेश नागरे याच्या छातीवर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची घटना मध्यप्रदेश राज्यातील खरगोन व बडवाणी जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.

त्याला एका गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली असल्याने तो तुरुंगात होता. तो नुकताच जामिनावर बाहेर आलेला होता. मयत उमेश नागरे हा चालक अखिल, अहमद, अनसार हे लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे समजते. या तीन साथीदारांसमवेत मयत उमेश नागरे हा अजमेर येथे दर्शनासाठी गेला होता.

दर्शनावरून परत येत असताना मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी व खरगोन जिल्ह्याच्या सीमेवर एका चार चाकी वाहनाने त्यांच्या चारचाकी वाहनाला थांबण्याचा इशारा केला व वाहन एका बाजूला घेण्यास सांगितले. समोरच्या चार चाकी वाहनातून दोन अज्ञात इसम उतरले.

त्यातील एकाने मागील शिटवर बसत मयत नागरे यांचे हात धरले तर दुसऱ्याने मयत नागरे याच्या वाहनाचा दरवाजा उघडून त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची हत्या केली.

मयत नागरे याचा मृतदेह तेथेच टाकून अज्ञात आरोपींनी आम्हाला वाहन पुढे चालवा नाही तर तुमचाही खून करू असे सांगितल्याने बाकीच्यांनी घाबरलेल्या परिस्थितीत वाहन तसेच पुढे आणले. त्यांनर मयत नागरे याचा खून करणारे अज्ञात व्यक्ती फरार झाले.

त्यानंतर झालेल्या घटनेची माहिती शंभर क्रमांकावर मध्यप्रदेश पोलिसांना दिली गेली अशी माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe