Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान आदिवासी बांधव शेतामध्ये कामाला गेले असताना अचानक घरातील घरगुती गॅस वापरातील गॅसने मोठा स्फोट झाला. त्यामुळे आदिवासी बांधवांचे घरे जळून खाक झाली. ही घटना दि ८ रोजी घडली.
चिखलठाण येथील मच्छिंद्र रामदास पवार हा तरुण आपल्या शेतामध्ये त्याच्या दोन भावंडांसह वस्ती करून राहत होता. त्याचबरोबर हालाखीची परिस्थिती असल्याने मोलमजुरी करण्यासाठी बाहेरगावी कामाला गेले
असता सायंकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान अचानकपणे घरातील घरगुती वापराचा गॅस चा अचानक स्पोट झाला आणि घरांना भीषण आग लागली. त्यामुळे त्याची स्वतः च घर व त्याच्या भावांचे घरे जळून खाक झाले.
घरातील सर्व सदस्य हे मोलमजुरी करण्यासाठी बाहेरगावी गेले असल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु त्यांच्या घरातील गृहपयोगी वस्तू त्याचबरोबर रोख रकमेसह संपूर्ण प्रपंच उध्वस्त झाला आहे.
यावेळी तलाठी डोके यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामा केला. त्याचबरोबर गॅस कंपनीचे संबंधित अधिकारी यांनीही घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. यावेळी राहुरीचे
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित कुटुंबीयांना किराणा बाजार आणि कपडे दिले आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांनी ही यावेळी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने व गॅस कंपनीने घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.