अहमदनगर बातम्या

शिर्डीत दहशतवादी..? ते दोघे आले अन गेलेही..? पोलिसांकडून कसून शोध सुरु

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शिर्डी शहरात बुधवारी एका नामांकित हॉटेलमध्ये दोन युवक आले होते. त्यांच्याकडे काही संशयित बॅगा होत्या.

हॉटेलचालकांनी त्यांच्या आधार कार्डची मागणी करून पडताळणी केली असता त्यात तफावत आढळली. त्यामुळे संबंधित तरुणांना रूम रिकामी करण्यास सांगितले. ते दोघे त्यांच्या आलिशान गाडीमध्ये बसून निघून गेले.

विशेष म्हणजे ते खोली खाली करताना उर्वरित पैसे न घेताच ते निघून गेले. दरम्यान, सोशल मीडियावर दहशतवादी आल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने शिर्डी शहरात घबराट निर्माण झाली होती. नामांकित हॉटेलात उतरलेले ते दोघे कोण यावरील संशयाचे धुके अद्यापही कायम आहेत.

पोलिसांचा नेहमीप्रमाणे शोधकार्य सुरू असून समाजमाध्यमात मात्र यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. या तरुणांचा येथे रूम घेण्याच्या हेतूबाबत विविध शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे.

पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शिर्डीत तळ ठोकून आहे. पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर दहशतवादी आल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने शिर्डी शहरात घबराट निर्माण झाली होती.

सोशल मीडियावरील या अफवेमुळे घबराट निर्माण झाली होती. मात्र हा मॅसेज पूर्णपणे खोटा असून कोणीतरी खोडासाळपणा करून शिर्डीत अफवा पसरवत असून नागरिकांनी तसेच साई भक्तांनी अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे

यांनी या घटने संदर्भात गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करताना सांगितले. प्रथमदर्शनी फोटोवरून ते तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाटतात. या तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. ते सापडल्यानंतरच सर्व गोष्टींचा खुलासा होईल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान ही विना क्रमांकाची गाडी शिर्डीत कशी आली? खोली सोडून गेल्यावर ते गाडीसह कुठे गेले, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

Ahmednagarlive24 Office